Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
घरफोडी करणा-या रेकॅार्डवरील दोघांना ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा, गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल केला हस्तगत,गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(०२) जुन रोजी यातील तक्रारदार अमोल कुमार भिमराव गजभिये, वय 44 वर्षे,रा.नाना चौक, कुंभारेनगर, गोंदिया यानी पोलिस स्टेशन गोंदीय शहर येथे तक्रार दिली की यांचे वडिलोपार्जीत घर राधाकृष्ण वार्ड, भिमनगर गोंदिया येथे आहे त्या घरात कुणीही राहत नाही, त्या घरात परिवारासह आठवड्यातून एक-दोन वेळा जाणे येणे असते दि. 26-05-24 चे रात्री 8.00 वा. ते दि 02-06-24 चे 06.00 वाजता दरम्यान ते परिवारासह कुंभारेनगर गोंदिया येथील राहते घरी हजर असतांना कुणीतरी अज्ञात चोरट्यानी राधाकृष्ण वार्ड, भिमनगर येथे घरफोडी करुन चांदीचे सिक्के व इतर मुद्देमाल चोरी करुन नेला अश्या फिर्यादीचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्रं. 354/2024 कलम 454, 457, 380, भादवी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता
गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचना प्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी सदर आरोपींचा शोध व गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे रेकॅार्डवरील गुन्हेगार 1)तौसीक ऊर्फ पिरु मुस्ताक शेख, वय 20 वर्ष 2)पंकज ऊर्फ नायडु दिलीप यादव, वय 26 वर्ष, दोन्ही रा. राधाकृष्ण वार्ड, भिमनगर, गोंदिया यांना संशयावरुन ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस केली असता दोघांनीही नमूद चोरी केल्याचे कबूली दिली तसेच त्यांचे ताब्यातून चोरलेला एकुण 7,200/- रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. प्रमोद चव्हाण, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक,निखील पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देशांन्वये उपविभागीय पोलिस अधिकारी गोंदिया,रोहीनी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गोंदिया शहरचे पोलिस निरिक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहा. पोलिस निरिक्षक सोमनाथ कदम, पो.हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, निशिकांत लोदासे, दिपक रहांगडाले; सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, म.पो.हवा. रिना चोव्हाण, पो.शि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने यांनी केली आहे.