Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ATM मशीन तोडुन चोरी करणारे १२ तासाचे आत जालना गुन्हे शाखेने केले जेरबंद….

10


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

जालना शहरातील कचेरी रोड येथील SBI एटीएम मशीन तोडुन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या अवघ्या 12 तासात स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, तीन आरोपी केले जेरबंद…..

जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(05) रोजी रात्री 03.00 वा चे  सुमारास गणपती गल्ली जुना जालना येथील SBI बँकेचे एटीएम मशीनचे वायर तोडुन एमटीएम मशीन मधील रोख रक्कम अज्ञात आरोपींनी चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा फिर्यादी संतोष सत्यनारायण गारोल, वय-46 वर्ष, व्यवसाय- नौकरी रा. लक्ष्मी कॉलनी,प्रज्ञानगर, शिव मंदीर जवळ, छावणी औरंगाबाद यांचे फिर्यादीवरुन पोलिस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने  पोलिस अधीक्षक अजय बंसल,अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी  यानी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अवघ्या 12 तासात तांत्रिक विश्लेषण, माहितगार यांचे कडुन माहिती संकलित करुन गुन्हा हा अत्यंत शिताफिने उघड करुन गुन्हयातील आरोपी 1) आदित्य आनंद नवगिरे, वय-21 वर्ष, रा. सुवर्णकारनगर, जालना 2) धनंजय अशोक उदावंत, वय-20 वर्ष, रा. गणपती मंदीरच्या पाठीमागे, सुवर्णकार नगर, जालना व 3) राहुल राजकुमार मुख्यदल, वय 23 वर्ष, रा. गणपती मंदीरजवळ, सुवर्णकार नगर, जालना यांना ताब्यात घेऊन त्याकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्यानी गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपींनी गुन्हा करतांना वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक  अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस उप निरीक्षक
राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, रामप्रसाद पव्हरे,सर्व स्थागुशा,जालना यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.