Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रेकॅार्डवरील व तडीपार गुंडांना युनीट १ ने अवैध शस्त्रासह घेतले ताब्यात….

12


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगार यांना युनीट १ ने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन कडुन ०२ देशी पिस्तोल व ०३ जिवंत काडतुसे केली जप्त…..

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.

त्याअनुषंगाने दि ०५/०६/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट १ मधील नापोशि  विशाल देवरे यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार मुज्जफर उर्फ मज्जु मैनौद्दीन शेख हा भोई गल्ली, कथडा नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल (कटटा) घेवुन फिरत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली
होती. सदरची माहीती वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे,शरद सोनवणे,विशाल काठे, संदिप भांड, नाझीमखान पठाण व चापोशि समाधान पवार यांनी भोईगल्ली
कथडा रोडवर, नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले.सदर इसमाचे नांव मुज्जफर उर्फ मज्जु मैनोद्दीन शेख, वय – ४२वर्षे, रा-भोई गल्ली कथडा भद्रकाली नाशिक असे असल्याचे समजले त्याचेकडुन ३०,०००/- रुपये कि.चे देशी बनावटीचे पिस्तोल, ०१ जिवंत काडतुसे ५०० /- रूपये कि.चे असे हस्तगत करण्यात आले आहे.

तसेच तडीपार इसम नामे आवेश उर्फ अब्बा निसार शेख हा शासनाची परवानगी न घेता चौकमंडई भद्रकाली नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल (कटटा ) घेवुन फिरत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहीती भोईगल्ली कथडा
रोडवर, नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. सदर इसमाचे नांव आवेश उर्फ अव्वा निसार शेख, वय – २३वर्षे, रा- चौक मंडई भद्रकाली नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्याचेकडुन ३०,०००/- रुपये कि.चे देशी
बनावटीचे पिस्तोल, ०२ जिवंत काडतुसे १००० /- रूपये कि.चे असे हस्तगत करण्यात आले आहे.

सदरच्या दोन्ही इसमाकडुन ०२ गावठी बनावटीचे पिस्तोल (कट्टा) तसेच ०३ जिवंत राउंड असा एकुण ६१,५०० /- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन दोघां इसमाविरूध्द भद्रकाली पोलिस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ व १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त(गुन्हे)  प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ प्रमुख पोलिस निरीक्षक  मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, शरद सोनवणे, नापोशि  विशाल देवरे, चापोहवा नाझीमखान
पठाण, पोशि जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.