Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०७:- पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याने पहिल्या पतीने मित्राच्या मदतीने पत्नीच्या दुसऱ्या पतीचा वार करुन खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सोनल उर्फ सुमित पाटेकर (रा. अग्रवाल प्राईड, पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दि.६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत प्राजक्ता सोनल उर्फ सुमित पाटेकर (वय-३४ रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व सनि राजेंद्र मारटकर (रा. गवळी आळी, पुणे) आणि एका अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या हल्ल्यात प्राजक्ता या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी हा फिर्यादी महिलेचा पहिला पती आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे.
घटस्फोटानंतर प्राजक्ता यांनी सुमित याच्यासोबत दुसरे लग्न केले. त्याचा राग मनात धरून आरोपी सनी याने आपल्या एका मित्राच्या सोबत घेऊन गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्राजक्ता यांच्या घरात घुसला. त्यावेळी प्रजक्ता, त्यांची सासू आणि पती गप्पा मारत बसले होते.
काही समजण्याच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्राने समीत याच्यावर खुनी हल्ला केला.
हा प्रकार पाहून प्राजक्ता पती सुमीत याला वाचवण्यासाठी मध्ये आले.
आरोपींनी त्यांच्या डोक्यात व हातावर धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
गंभीर जखमी झालेल्या सुमीत याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.व फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव करीत आहेत.