Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अवैध पिस्टल व काडतुसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…

12


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

देशी बनावटीच्या पिस्टल व दोन जिवंत काडतुससह दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…..

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी करीता अवैध शस्त्र बाळगणा-या विरुध्द कार्यवाही करणेबाबतब आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन आवश्यक सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषगांने दि.(८) रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथक परतवाडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहीती मिळाली कि, दोन इसम घटांग ते परतवाडा रोडने मोटर सायकलवर अवैधरित्या गावठी पिस्टल घेवुन येणार आहेत.अशा गोपनिय खबरेवरुन स्थागुशाचे पथकाने घटांग ते परतवाडा रोडवर सापळा लावला असता दोन इसम मिळालेल्या खबरेप्रमाणे संशयितरित्या घटांग कडुन परतवाडा कडे येतांना दिसले. स्थागुशा अमरावती ग्रा चे पथकाने शिताफिने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता दोन्ही आरोपींचे ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे मॅक्झीनसह
पिस्टल, ०२ जिवंत काडतुस, एक खाली मॅक्झीन व ०३ मोबाईल फोन मिळुन आले.

सदर दोन्ही इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे १) मोहम्मद रुबा मोहम्मद खलील वय ३० वर्ष रा. इतवारा बाजार, चारा गल्ली, अमरावती व क्र २) मोहम्मद तौसीफ मोहम्मद सादिक वैय २३ वर्ष रा.धरम काटा, वलगाव रोड, अमरावती
असे सांगितले.त्यांना त्यांचे ताब्यातुन मिळुन आलेल्या गावठी बनावटीचे पिस्टलचे परवाना बाबत विचारणा केली असता
त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. यावरुन दोन्ही आरोपीकडुन ०१ गावठी बनावटीचे मॅक्झीनसह पिस्टल , ०२ जिवंत काडतुस, एक खाली मॅक्झीन व ०३ मोबाईल फोन व होन्डा युनिकॉर्न मोटर सायकल असा एकुण १४८,००० रुपयेचा माल जप्त करण्यात आला. आरोपी यांनी सदर पिस्टल व काडतुस कोठुन आणले व त्याचा वापर कशासाठी करणार होते ? याचा तपास सुरु असुन सदर दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी पोलिस स्टेशन परतवाडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक. विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा. यांचे नेतृत्वात सपोनि सचिन पवार, पोशि युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक मंगेश मानमोडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.