Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवरात्री महोत्सव निमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे 21 किमी मॅरेथॉन चे आयोजन

14

पुणे | नवरात्री महोत्सव निमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीच्या वतीने रावेत ते चतुर्श्रुंगी देवी अशी दरवर्षी घेण्यात येणारी 21 किलोमीटर मॅरेथॉन शुक्रवारी संध्याकाळी यशस्वीपणे पार पडली , पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 100 हून आधीक जणांनी सहभाग घेतला. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांनी शुक्रवार दिनांक 8 ऑक्‍टोबर रोजी हा उपक्रम राबवण्यात आला. सदर स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष होते. सर्व धावपटू संध्याकाळी आठ वाजता रावेत ब्रिज येथे जमले होते. चिंचवड येथील प्रेमराज कलेक्शन चे दर्शन लुंकड, क्वींस्टाऊन सोसायटीच्या सदस्य गौरी जोशी, महेंद्र दिवाकर यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी आयएएस चे गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

मॅरेथॉन चा मार्ग रावेत ब्रिज – डांगे चौक – जगताप डेरी – ब्रेमेन चौक – पुणे विद्यापीठ – चतुर्श्रुंगी देवी मंदिर असा होता.

पुणे ,पिंपरी-चिंचवड, मावळ परिसर अशा विविध ठिकाणाहून धावपटूनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला.आम्ही हा उपक्रम गेली सहा वर्षे मोफत करत आहोत याला दर वर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे यासाठी धावपटून कडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. महिला व लहान मुलांचा यामध्ये विशेष सहभाग दिसून आला. पुणे विद्यापीठ येथे प्रेमराज कलेक्शन चिंचवड यांच्यातर्फे सर्वांना अल्पोपहार आयोजन करण्यात आले होते असे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांच्या तर्फे सांगण्यात आले.
नवरात्री मॅरेथॉन नियोजनामध्ये इंडो अथलेटिक्स सोसायटीचे रोहित जयसिंघानी, संदीप परदेशी, कपिल पाटील, अभिनंदन कासार, रमेश माने, संजीवनी वायाळ, सोनल वामन, अविनाश अनुशे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.