Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Bats Die Rapidly : वटवाघुळांच्या मृत्यूत अचानक वाढ, पर्यावरणात मोठे बदल, मानवी जीवन संकटात?

11

Kanpur Nana Rao Park bats dies : पावसाळा सुरु झाला तरी यंदा ऋतु चक्रात बदल झाल्याने जूनचा अखेर जवळ आला तरी पावसाची हजेरी हवी तशी लागलेली दिसत नाही. याचा फटका जसा मानवी आयुष्याला बसतोय तसेच काहीसे आता पक्ष्यांचा जीवाला सुद्धा धोका निर्माण झालाय. कानपूरातील नाना राव पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात वटवाघूळ मृत अवस्थेत आढळून आलेत. पर्यावरणाच्या दृष्टीने निशाचर असेलेल वटवाघूळ पक्षी जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. पण आता मात्र वटवाघुळांच्या अशा झपाट्याने होणाऱ्या मृत्यूमुळे बदलत्या ऋतु चक्राचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि मानवी जीवन धोक्यात असे सारेच प्रश्न निर्माण झाले आहेत.

उष्णतेने वटवाघुळांचा झपाट्याने मृत्यू

उत्तर भारतात मैदानी पट्टा असल्याने मोठ्या प्रमाणात उष्णेतेची लाट जाणवते याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा केले होते. पण फक्त या उष्णेतेच्या लाटेचा सामना नागरिकांना नाही तर थेट पक्ष्यांना सुद्धा करावा लागलाय. वटवाघूळ मोठ्या प्रमाणात झाडावर लटकून राहतात. पण कानापुरात उष्णतेचा तडाका सहन न झाल्याने वटवाघुळांचा मृत्यू झालाय. साधारण १०० हून अधिक वटवाघुळांचे मृत शरीर नाना राव पार्कमध्ये आढळून आलेत. स्थानिक प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पार्कमध्ये कोणत्याही प्रकारे नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही परिसरात घाण वास सुटल्याने श्वास घेणे कठीण जाते असे स्थानिक म्हणतात. मोठ्या प्रमाणात वटवाघुळांच्या शरीराचे अवशेष पडल्याने रोगराई पसरेल असे स्थानिक चिंता व्यक्त करताना दिसतात.
Hajj Yatra : मक्केत उष्णतेचा पारा 52 अंशावर, उष्णतेमुळे ५५० हून अधिक हज यात्रेकरूंचा झाला मृत्यू

नाना राव पार्कमध्ये हजारो वर्ष जुने झाडे आहेत याच झाडांवर गेली कित्येक वर्ष वटवाघुळांनी त्याचे घर बनवले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये ४४ ते ४५ डिग्रीवर उत्तर भारतात तापमान पोहचले आहे. अशातच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराग सिंह यांनी माहिती दिली की वटवाघुळांना २ डिग्री जास्त तापमान जाणवते म्हणजे त्यांना साधारण ४४ ते ४५ डिग्रीवर असेलेले तापमान वटवाघुळांना ४७ ते ४८ डिग्रीपर्यंत पोहचल्यावर होत असलेली उन्हाची झळ जाणवत असेल. अशातच वटवाघूळ झाडातील पाण्यावर अवलंबून असते पण उन्हाळ्यामुळे झाडच पाण्याविना सुकली आहेत अशातच वटवाघुळांना कोणतीही पाण्याची सोय नसल्याने वटवाघुळांच्या मृत्यूत झपाट्याने वाढ झाली.

अशातच वटवाघूळ पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक उपयोगी समजले जातात. कीटकांची लोकसंख्या नियंत्रित ठेवणे हे मुख्य काम वटवाघुळ करतात ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर अधिकचे कीटक रसायने वापरण्याची गरज भासत नाही. वटवाघुळांच्या अश्या मृत्यूमुळे पर्यावरणाला धोका पोहचू शकतो. यासह कीटक वनस्पतींच्या पुनरुत्पादनावर परिणाम करु शकतात, किंवा काही रोगांचा प्रसार वाढण्याची चिंता सुद्धा पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.