Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन

21

तेज पोलीस टाइम्स _ परवेज शेख

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणेच्या अधिकार क्षेत्रातील हद्दीमध्ये पुणे सातारा रा. म. क्र. ४८ वरील खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोडच्या दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे ३० जूनपर्यंत काढून घ्यावीत. ही अतिक्रमण ७ दिवसात न काढल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई येणार आहे.

जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व नागरिकांनी आपल्या होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे असतील तर स्वखर्चातून काढून घ्यावे. अन्यथा सदरचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट २००२ अन्वये निष्कासित करण्यात येणार आहे. व त्याचा खर्च व दंड संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करण्यात येईल.

विहीत मुदतीनंतर होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे काढताना नुकसान किंवा असुविधा झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावी, असेही पुणे एनएचएआयच्या प्रकल्प संचालकांनी दिली आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“addons”:2},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}
Leave A Reply

Your email address will not be published.