Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुजरात येथील दोन कुख्यात सुपारी किलर जळगाव गुन्हे शाखेने केले जेरबंद…

10


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

गुजरात मधिल कुख्यात सुपारी किलर यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि०८/०६/२०२४ रोजी सुरत येथील उमरपाडा पो.स्टे. ०२४३ / २०२४ भादवि कलम ३०२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी  अफजल अब्दुल शेख व त्याचा साथीदार प्रज्ञेश दिलीप गामीत हा खुन झाल्यापासुन गुजरात राज्यातून फरार झाला होता त्यांच्या मार्गावर त्यांना पकडणे करीता सुरत पोलिस हे अहोरात्र मेहनत करीत होते.

त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बबन आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना उमरपाडा पो.स्टे. ०२४३ / २०२४ भादवि कलम ३०२ या गुन्ह्याची
सविस्तर माहिती देवून सदर आरोपींचा शोध घेणे बाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे दिनांक २७/०६/ २०२४ रोजी नमुद आरोपींचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा अकरम शेख, यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, उमरपाडा
पो.स्टे.०२४३/२०२४ भादवि कलम ३०२ या गुन्ह्यातील संशयीत हे  हात देत असून ट्रकमधून कोठेतरी निघुन जाण्याच्या तयारीत आहेत.

त्यानुसार बबन आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, पोहवा सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव यांचे पथक हे तात्काळ अजिंठा चौफुली येथे पाठविले. तिथे सदरच्या पथकाने आपली स्वत:ची ओळख लपवत सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अनुक्रमे १)अफजल अब्दुल शेख, वय ३८, रा. उमरपाडा मशिदीजवळ सुरत, २) प्रज्ञनेश दिलीप गामीत, वय २६, रा.तरकुवा डुंगरी फलीया ता. व्यारा जि.तापी असे सांगीतले.

सदर आरोपींना ताब्यात घेवून अधिक विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, सुरतचे MIM चे खुर्शीद अली सैय्यद यांनी १६ लाख रु.ची सुपारी दिल्यावरून १) बिलाल चांदी, २) अज्जु या दोघांचा गळा कापून जिवेटार मारले आहे असे सांगीतले त्यावरुन
सदर आरोपीतांचा पुर्व इतिहास पाहता आरोपी क्र. १ अफजल अब्दुल शेख, वय ३८, रा. उमरपाडा मशिदीजवळ सुरत याच्यावर यापुर्वी सुपारी घेवून ५ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र. २ प्रज्ञेश दिलीप गामीत, वय २६, रा.तरकुवा डुंगरी फलीया ता. व्यारा जि.तापी याच्यावर यापुर्वी १५ गुन्हे दाखल आहेत.

सदर दोन्ही आरोपी हे सुरत येथील कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्या शोधाकरीता गुजरात पोलिसांनी ११ पथके तयार केली होती. सदर दोन्ही आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पथकास यश आले आहे.

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, अपर संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग यांचे
मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.