Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या भोंदुबाबावर अखेर गुन्हा दाखल…

9

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या भोंदुबाबावर अखेर गुन्हा दाखल…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अखेर त्या व्हायरल व्हिडिओतील भोंदूबाबावर गुन्हा दाखल…

 

 

बुलढाणा (प्रतिनिधी) – काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या मध्ये एका भोंदू बाबाने दारू सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला दारू सोड, दारू सोड असं म्हणत त्याला मारहाण केली होती. अन् त्या मारहाणीची चित्रिफित करून सोशल मीडियावर शेअर केली होती. ज्या नंतर सदर चित्रफित-व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्याची पोलिसांनी शेवटी दखल घेऊन माहिती काढून त्या भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (दि.२४ जुन) रोजी सोशल मिडीयावर घाटनांद्रा येथील भोंदूबाबा-महाराज हे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झालेला होता. सदर व्हिडिओच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बुलढाणा सुनिल कडासने यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवुन माहिती घेणेबाबत रायपुर ठाणेदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार रायपुर ठाणेदार यांनी प्रकरणाची तात्काळ माहिती घेवुन सदर प्रकरणातील पिडीत व्यक्तीचा शोध घेण्यात आला व त्यानुसार सदर व्यक्ती हा राजेश श्रीराम राठोड (वय ३६ वर्षे) रा.माळेगांव, ता.मंठा, जि.जालना हे (दि.२९जुन) रोजी पोलिस स्टेशनला आल्याने व घडलेल्या प्रकरणाबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्राम घाटनांद्रा शिवारात राहत असलेल्या शिवाजी पुंडलिक बरडे/उर्फ शिवा महाराज याचे विरूध्द पोलिस स्टेशन रायपुर येथे फिर्यादीच्या तक्रारीवरून ३२३,३२४,२९४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन.पुढील तपास ठाणेदार पोलिस स्टेशन रायपूर दुर्गेश राजपुत करीत आहेत

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक सुनील कडासने,अपर पोलिस अधिक्षक,बुलढाणा बी बी महामुनी,उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग बुलडाणा सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार दुर्गेश राजपूत हे  करीत आहेत.

तसेच पोलिस स्टेशन रायपुर यांचे वतीने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, पोलिस स्टेशन हद्दीत अशा प्रकारे इतर ठिकाणी काही प्रकरणे घडले असतील किंवा होत असतील तर निसंकोचपणे पोलीस स्टेशन रायपुर यांना कळवावे त्या नुसार संबंधीताविरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.