Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपुर शहर गुन्हे शाखा युनीट २ ने उघड केले ७ वाहनचोरी व घरफोडीचे गुन्हे…

10


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

एकास ताब्यात घेऊन गुन्हेशाखा, युनिट २ ने  घरफोडीसह वाहन चोरीचे ७ गुन्हे केले उघड…..

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी श्वेता चंद्रमणी देशभ्रतार, वय २७ वर्षे ह्या पोलिस स्टेशन गिट्टीखदान हद्दीतील हजारी पहाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया मागे, नागपुर येथे राहतात त्या दि(४)एप्रिल २०२४ चे संध्या ५.०० वा. ते ५.३० वा. चे दरम्यान त्यांनी त्यांची अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. ए ३१ एफ. डी १५३५ किंमती ५०,००० /- रू ची पोलिस मुख्यालय येथील शिवाजी मैदान येथे लॉक करून पार्क केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची अॅक्टीव्हा गाडी चोरून नेली अशा फिर्यादी यांनी अशा दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरीष्ठांचे सुचनेनुसार गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनीट २ हे करीत असतांना सदर  तपासात गुन्हेशाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, एक संशयीत ईसम पोलिस ठाणे सिताबर्डी हद्दीत वाहनासह उभा आहे अशा माहितीवरून पोलिस ठाणे सिताबर्डी हद्दीतुन नमुद ईसमास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव रोहीत रामसखा बलराम पांडे वय ३२ वर्ष रा. गाव मेढरा, ता. लालगंज, जि. मिर्जापूर, उत्तर प्रदेश, ह.मु मानस चौक ते गणेश टेकडी मंदीराचे बाजुला, नागपूर असे सांगीतले.

त्यास त्याचे जवळ असलेली अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. ए ३१ एफ. डी १५३५ बाबत विचारपूस केली असता त्याने नमुद वाहन पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीतुन चोरी केल्याचे सांगीतले. तसेच त्यास अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने पोलिस ठाणे गणेशपेठ येथुन -१, पोलिस ठाणे सदर येथुन नागपूर ग्रामीण येथील पोलीस ठाणे बोरी हद्दीतुन – २ वाहन चोरी केल्याचे तसेच पोलिस ठाणे नंदनवन हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. सदर आरोपीचे ताब्यातुन एकुण ०६ दुचाकी वाहन व एक ४२ इंच कलर एल.सी.डी. असा एकुण अंदाजे ३,७०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस मुद्देमालासह पुढील
तपासकामी गिट्टीखदान पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उपआयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली,गुन्हे शाखा युनीट २ च्या  मपोनि  शुभांगी देशमुख, सपोनि. गजानन चांभारे, पोउपनि मनोज राऊत, पोहवा. नरेश तुमडाम, संदीप चंगोले, दिनेश डवरे, नापोअं. कमलेश गणेर, प्रविण शेळके, पोशि आशिष धंदरे, सुरेश तेलेवार, सुनिल कुवर, मंगल जाधव व प्रविण चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.