Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Microsoft Crowd Strike Global Outage: जगभरातील Microsoft सर्वर पूर्णपणे ठप्प झाले आहेत, ज्यामुळे एअरलाइन पासून मोठ्या कंपन्यांना फटका बसला आहे. विंडोज 10 ओएस असलेल्या पर्सनल लॅपटॉपवर देखील क्राउड स्ट्राईकचा परिणाम झाला आहे. यावर एक उपाय देखील कंपनीनं सांगितलं आहे.
मायक्रोसॉफ्ट ठप
जगभरातील लाखो मायक्रोसॉफ्ट विंडोज युजर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर येत आहे. ज्यामुळे लोकांच्या सिस्टम अचानक बंद होत होत आहेत किंवा आपोआप चालू होत आहेत. याला क्राउडस्ट्राइक अपडेट कारणीभूत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
भारतातील एअरलाइनवर झाला परिणाम
मायक्रोसॉफ्ट आउटेज झाल्यामुळे जगभरातील प्रमुख एअरलाइन्सवर याचा परिणाम झाला आहे. दिल्ली आणि मुंबईसह अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यात इंडिगो, स्पाइसजेट आणि आकासा एअरचा समावेश आहे. एअरलाइन्ससह ऑस्ट्रेलियात टीव्ही चॅनेल्स तर लंडनमध्ये स्टॉक मार्केटवर देखील परिणाम झाला आहे.
तुम्हाला ब्लू स्क्रीन आल्यास काय करावे?
तुमच्या विंडोज 10 लॅपटॉपवर अशी ब्लु स्क्रीन आल्यास लॅपटॉप तुम्ही ठीक करू शकता. यासाठी कंपनीनं ब्लु स्क्रीन ठीक करण्याची पद्धत देखील सांगितली आहे.
- सर्वप्रथम Windows सेफ मोड किंवा फिर विंडोज रिकव्हरी एन्व्हायर्मेंटमध्ये बूट करा.
- त्यानंतर C:\Windows\System32\drivers\CrowdStrike मध्ये जा.
- इथे C-00000291*.sys फाइल सर्च करा.
- ही फाइल मिळाल्यानंतर ती डिलीट करा.
- या स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला पीसी किंवा लॅपटॉप रिबूट करावा लागेल.
नोट: हा तात्पुरता उपाय आहे त्यामुळे अशी समस्या पुन्हा कधीही येऊ शकते. यावर कंपनी काम करत आहे आणि लवकरच ही समस्या सोडवण्यासाठी अपडेट जारी केला जाऊ शकतो.