यूपीएससी अंतर्गत होणार्या कंबाईंड जीओ सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२४ मधील पदे आणि पदसंख्या:
‘जीऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया (GSI)’, मिनिस्ट्री ऑफ माईन्समधील पदे-
जीऑलॉजिस्ट -३४ पदे.
जीओफिजिसिस्ट – १ पद.
केमिस्ट ग्रुप-ए – १३ पदे.
‘सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड’ (CGWB) मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेसमधील पदे-
सायंटिस्ट ‘बी’ (हायड्रोजीऑलॉजी) – ४ पदे.
सायंटिस्ट ‘बी’ (केमिकल) – २ पदे
सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) – २ पदे.
(वाचा: Bank Job 2023: पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत ‘आयटी लिपीक’ पदासाठी भरती.. आजच करा अर्ज…)
पात्रता:
जीओलॉजिस्ट – या पदासाठी जीऑलॉजिकल सायन्स/ जीऑलॉजी/ अॅप्लाईड जीऑलॉजी/ जीओएक्स्प्लोरेशन/जीओकेमिस्ट्री/ ओशियानोग्राफी/ पेट्रोलियम जीओ सायन्सेस आदि विषयातील मास्टर्स डिग्री.
जीओफिजिसिस्ट- या पदासाठी एम.एस्सी. (फिजिक्स/ अॅप्लाईड फिजिक्स/ जीओफिजिक्स/ अॅप्लाईड जीओफिजिक्स/ मरिन जीओफिजिक्स इ.)
केमिस्ट ग्रुप ए आणि सायंटिस्ट ‘बी’ (केमिकल)- या पदांसाठी एम.एस्सी. (केमिस्ट्री/ अॅप्लाईड केमिस्ट्री/ अॅनालायटिकल केमिस्ट्री)
सायंटिस्ट ‘बी’ (हायड्रोजीऑलॉजी) – या पदासाठी जीऑलॉजी/ अॅप्लाईड जीऑलॉजी/ मरिन जीऑलॉजी/ हायड्रोजीऑलॉजी या विषयांतील पदव्युत्तर पदवी.
सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) – या पदासाठी एम.एस्सी. (फिजिक्स/ अॅप्लाईड फिजिक्स/ जीओफिजिक्स/ अॅप्लाईड जीओफिजिक्स/ मरिन जीओफिजिक्स) किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सी. (एक्स्प्लोरेशन जीओफिजिक्स) किंवा एम.एस्सी. (टेक्नॉलॉजी) (अॅप्लाईड जीओफिजिक्स).
वयोमर्यादा:
सर्व पदांसाठी १ जानेवारी २०२४ पर्यंत किमान वयोमर्यादा २१ तर कमाल ३२ वर्षेपर्यंत.
इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ३७ वर्षेपर्यंत
(दिव्यांग उमेदवार – खुलागट – ४२ वर्षेपर्यंत, इमाव – ४५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ४७ वर्षेपर्यंत)
निवड पद्धती: या भरतीसाठी प्रथम प्रीलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे पूर्वपरीक्षा घेतली जाईल. त्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांची पर्सोनॅलिटी टेस्ट/ मुलाखत घेतली जाईल. त्यातून मग अंतिम निवड केली जाईल.
अर्ज शुल्क: या भरतीसाठी २०० रुपये अर्ज शुल्क आहे तर .अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना शुल्क माफ आहे.
या भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ‘यूपीएससी’च्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
या भरतीसंदर्भातील सविस्तर अधिसूचना येथे वाचा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० ऑक्टोबर २०२३
(वाचा: Scholarship Schemes: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणाचा मार्ग सुलभ! शासनाकडून शिष्यवृत्ती जाहीर…)