राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती! चुकूनही चुकवू नका ही संधी..

National Health Mission Dhule 2023: तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी संबधित शिक्षण घेतले असले तर धुळ्यामध्ये तुमच्यासाठी नोकरीच्या खास संधी उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे येथे भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेद्वारे आरोग्य विभागातील विविध २० पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा पदांचा समावेश आहे. नुकतीच या भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १७ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन, अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहिती पाहूया:

‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरती २०२३’ मधील पदे आणि पद संख्या:
वैद्यकीय अधिकारी – ०५ जागा
स्टाफ नर्स – ०३ जागा (पुरुष आणि स्त्रिया)
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – ०३ जागा
कीटकशास्त्रज्ञ – ०३ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०६ जागा
एकूण पद संख्या – २०

शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
स्टाफ नर्स – जीएनएम/ बीएससी नर्सिंग
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर (एमबीबीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस/बीयूएमएस/बीडीएस)
कीटकशास्त्रज्ञ – एमएससी झुओलॉजी आणि संबधित कामाचा ०५ वर्षांचा अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – विज्ञान शाखेटून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि डीएमएलटी

(वाचा: Postal Life Insurance Mumbai Bharti 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरी!)

वेतन:
वैद्यकीय अधिकारी – ६० हजार
स्टाफ नर्स – २० हजार
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – ३५ हजार
कीटकशास्त्रज्ञ – ४० हजार
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७ हजार

नोकरी ठिकाण: धुळे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑक्टोबर २०२३

अर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे (उमेदवाराने अर्ज कार्यालयीन वेळेत व्यक्तिशः येऊन सादर करायचे आहेत.)

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: BECIL Recruitment 2023: ‘बेसिल’अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील विविध पदांसाठी खास भरती! आजच करा अर्ज..)

Source link

Career NewsDHULE zp JOBS 2023Government jobJob Newsjobs in dhulenational health mission JOBSnational health mission jobs 2023national health mission recruitment 2023NHM Dhule Bharti 2023NHM Dhule recruitment 2023
Comments (0)
Add Comment