चलन नोट मुद्रणालय नाशिक येथे १०० हून अधिक पदांसाठी भरती; पगारही आहे भरपूर

‘सीएनपी’ ( Currency Note Press, Nashik) म्हणजे चलन नोट मुद्रणालय, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत ५ संवर्गातील एकूण ११७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यवेक्षक, कलाकार, सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे.

या पदांसाठीची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १८ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीप्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करायच हे पाहूया.

‘चलन नोट मुद्रणालय, नाशिक भरती २०२३’ मधील पदे आणि पात्रता:
पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) – २ जागा
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) – १ जागा
कलाकार (ग्राफिक डिझायनर) – १ जागा
सचिवालय सहाय्यक – १ जागा
कनिष्ठ तंत्रज्ञ – ११२ जागा
एकूण पदसंख्या – ११७

शैक्षणिक पात्रता:
पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) – संबधित विषयातील अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा बीई/ बीटेक
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) – संबधित भाषा विषयातील पदव्युत्तर पदवी
कलाकार (ग्राफिक डिझायनर) – फाईन आर्ट, व्हीजुयल आर्ट किंवा समकक्ष विषयात पदवी
सचिवालय सहाय्यक – कोणत्याही विषयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ तंत्रज्ञ – NCVT/ SCVT मान्यताप्राप्त संबधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
(या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत दिलेली आहे. अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे. )

(वाचा: EXIM Bank Recruitment 2023: इंडिया एक्झिम बँकेत भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

वयोमर्यादा:
पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) – किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) – किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे
कलाकार (ग्राफिक डिझायनर) – किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे
सचिवालय सहाय्यक – किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ – किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज प्रक्रिया प्सुरु होण्याची तारीख: १९ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ नोव्हेंबर २०२३

वेतनश्रेणी:
पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) – २७ हजार ६०० ते ९५ हजार ९१०
पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) – २७ हजार ६०० ते ९५ हजार ९१०
कलाकार (ग्राफिक डिझायनर) – २३ हजार ९१० ते ८५ हजार ५७०
सचिवालय सहाय्यक – २३ हजार ९१० ते ८५ हजार ५७०
कनिष्ठ तंत्रज्ञ – १८ हजार ७८० ते ६७ हजार ३९०

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘चलन नोट मुद्रणालय, नाशिक’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(फोटो सौजन्य – चलन नोट मुद्रणालय, नाशिक यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट)

(वाचा: Mumbai University News: मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे महाद्वार होणार खुले)

Source link

CNP Nashik Bharti 2023CNP nashik job vacancy 2023CNP Nashik recruitmentCNP Nashik Recruitment 2023Currency Note Press NashikCurrency Note Press Nashik Recruitment 2023government jobsJob NewsNashik news
Comments (0)
Add Comment