‘अणुऊर्जा विभाग’ येथे विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

DPS DAE Recruitment 2023: केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या आणि देशातील एक महत्वाच्या मानल्या जाणार्‍या अणुऊर्जा विभाग येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विभागाच्या मुंबई येथील खरेदी आणि भांडार संचालनालयासाठी काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर या पदांचा समावेश आहे.

नुकतीच अणुऊर्जा विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली असून या पदांच्या एकूण ६२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून ३१ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता , वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘अणु ऊर्जा विभाग, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर (गट – क) – ६२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ६२ जागा

पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून पदवीधर असावा. किंवा संबधित विषयातील अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावी. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वयोमर्यादा : किमान १८ वर्षे ते कमाल २७ वर्षे (कमाल वयोमर्यादेत राखीव प्रवर्गासाठी सवलत देण्यात आली आहे.)

अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस वर्गासाठी २०० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.

नोकरी ठिकाण :
मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘अणुऊर्जा विभाग’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

central government job 2023DPS DAE Bharti 2023DPS DAE Recruitment 2023Government jobrecruitmentअणु ऊर्जा विभाग भरती २०२३
Comments (0)
Add Comment