Surya Rashi Parivartan : ‘व्हॅलेंटाईन डे’ आधी सूर्य संक्रमण, या राशींसाठी शुभयोग, पाहा तुमचे राशिभविष्य

Surya Rashi Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याला फार महत्त्व आहे. सूर्य हा ऊर्जेचे प्रतिक मानला जातो. अतिशय कठीणतम कामे मार्गी लावण्याची ताकद सूर्यात असते. त्यामुळे सूर्याचे भ्रमण नेहमीच महत्त्वाचे ठरते. सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश प्रेमजीवनावरही प्रभाव टाकणार आहे.

मेष राशीसाठी सूर्य संक्रमण लाभदायक

मेष राशीसाठी सूर्याचे कुंभेतील भ्रमण लाभदायक ठरेल. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक बळकट होईल आणि आपपसांतील समजही वाढेल. तुम्ही जोडीदाराबद्दल प्रामाणिक आहात, त्यातून नातेसंबंधातील विश्वासार्हताही वृद्धिंगत होईल. प्रेमसंबंधाचे रूपांतर वैवाहिक नात्यात होण्याचे प्रबळ संकेत आहेत.

वृषभ राशीसाठी सूर्य संक्रमणाचा शुभयोग

सूर्याचे कुंभ राशीतील संक्रमण वृषभ राशीसाठी शुभ योग घेऊन येत आहे. प्रेमसंबंधासाठी हे संक्रमण तुम्हाला अनुकूल राहील. विशेष म्हणजे तुमच्या कुटुंबाचा तुमच्या प्रेमसंबंधाना पाठिंबा मिळणार आहे. तुमचे जोडीदाराबद्दलच्या प्रेमात प्रामाणिकपणा आहे.

मिथुन राशीसाठी सूर्य संक्रमणचा शुभयोग

कुंभ राशीत सूर्याचे संक्रमण १३ तारखेला होईल, हे संक्रमण मिथुन राशीसाठी शुभ योग घेऊन येत आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सर्वच पातळ्यावर चांगले होतील. या कालावधित तुम्ही अधिकाधिक समंजस बनाल तसेच जोडीदाराला समजून घेण्याची समजही वाढेल. दोघांतील संबंध अधिकाधिक दृढ होत जातील.

कर्क राशीसाठी सूर्य संक्रमण प्रतिकूल

सूर्य राशीचे कुंभेतील संक्रमण कर्क राशीसाठी प्रतिकूल ठरणार आहे, त्यामुळे या काळात सावध राहाव, कारण दोघांतील वाद वाढू शकतात. दोघांत अहंमपणामुळे एकमेकांना समजून घेण्यात अपयश येऊ शकते, त्यामुळे हे वाद होतील. जोडीदाराशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवला तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. यामुळे दोघांतील नात्यात थोडा दुरावा येऊ शकते. या काळात जोडीदाराच्या विचारांशी मिळतेजुळते घेऊन तुम्ही नातेसंबंधातील दरी दूर करण्याचा प्रयत्न करावा.

सिंह राशीसाठी सूर्य संक्रमणाचा अशुभ प्रभाव

सिंहेचा राशीस्वामी सूर्य आहे. या सूर्याचे संक्रमण कुंभ राशीत होणे, तुमच्या प्रेमजीवनासाठी फारसे अनुकूल नाही. जोडीदाराशी असलेले तुमचे संबंध या संक्रमणामुळे खराब होऊ शकतात, या मागे अहंकार हे मुख्य कारण असेल. आपापसांतील गैरसमजामुळे नातेसंबंध बिघडतील आणि नात्यातील गोडवा कमी होईल.

अनिता किंदळेकर यांच्याविषयी

अनिता किंदळेकर
अनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.… Read More

Source link

February 14thlovelucky in loveRomanceSurya Gochar 2024Valentines Day 2024Zodiac Signsती मला हो म्हणेल का?प्रेमाचा दिवसव्हॅलेंटाईन डे 2024
Comments (0)
Add Comment