आजचे अंकभविष्य, 20 जून 2024 : मूलांक 2 जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील! मूलांक ७ कामाच्या ठिकाणी लक्ष द्या! मूलांक 1 ते 9 साठी कसा आहे गुरुवार?

Numerology Prediction, 20 June 2024 : अंकशास्त्रानुसार, गुरुवार २० जूनला भगवान विष्णूच्या कृपेने, मूलांक १ असलेले लोक स्पर्धेता विजयी होतील. तक मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींचे जोडीदाराशी संबंध चांगले असतील. मूलांक ३ असणारे आज धार्मिक कार्यात व्यस्त राहातील. मूलांक ६ असणाऱ्यांनी हनुमान चालिसाचे पठण करावे, ज्यामुळे सर्व त्रास दूर होतील. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला झाला आहे. त्यांची मूलांक संख्या २ आहे. जाणून घेऊया मूलांक १ ते मूलांक ९ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल.

मूलांक 1: स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल.

मूलांक १ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मानसिक समस्या दूर होतील. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस चांगला असेल. अचानक तुमचे रखडलेले पैसे मिळतली. क्रीडा संबंधित क्षेत्रात असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. जोडीदारासोबतचे नाते सुधारु शकते.
शुभ अंक- 13
शुभ रंग- लाल

मूलांक 2: जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील

मूलांक २ असणाऱ्या लोकांचे नशीब आज त्यांच्या सोबत असणार आहे. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस चांगला असेल. गुंतवणूकीतून आज तुम्हाला दुप्पट परिणाम मिळतील. पैशाची कमतरता जाणवणार नाही. मानसिकदृष्ट्या आज तुम्ही आनंदी राहाल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर जाण्याचा विचार करु शकता. कुटुंबासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. जोडीदाराशी प्रेमाने वागाल.
शुभ अंक-22
शुभ रंग – नारंगी

मूलांक 3: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल

मूलांक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. पैसे तुमच्या क्षमतेनुसार गुंतवा. कोणत्याही धार्मिक कार्याक्रमात दान करा. भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या विचारांपेक्षा तुम्ही अधिक सकारात्मक व्हाल. लोकांना भेटण्याची संधी मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयात कुटुंबातील सदस्य सोबत असतील. जोडीदार प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत असेल.
शुभ अंक-26
शुभ रंग- पिवळा

मूलांक 4: धनहानी होऊ शकते.

मूलांक ४ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमचे विचार आणि शब्द दोन्ही नकारात्मकतेने भरलेले असतील. कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबातील सदस्यांशी कोणतेही नकारात्मक संभाषण टाळा. तुमच्या व्यवसाय आणि नोकरीसाठी चांगले होणार नाही. आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता निर्माण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत दिवस चांगला आहे. जोडीदारसोबतचे संबंधही चांगले राहतील.
शुभ अंक-13
शुभ रंग- नारंगी

मूलांक 5: जोडीदारासोबत वाद-विवाद होतील

मूलांक ५ लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहिल. आज वैयक्तिकरित्या स्वत:ची विशेष काळजी घ्या. पोटाच्या कोणत्यातरी विकाराने ग्रासले आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुमचा वेळ चांगला जाईल. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. शांत राहाणे आणि सौम्य भाषा वापरणे तुमच्यासाठी उत्तम राहिल.
शुभ अंक-10
शुभ रंग- पिवळा

मूलांक 6: हनुमान चालीसाचे पठण करा

मूलांक ६ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन मार्गांचा विचार करु शकता. भविष्यात आर्थिक फायदा होईल. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मनोरंजनाची योजना आखू शकता. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला आहे. हनुमान चालिसाचे पठण करा.
शुभ अंक-12
शुभ रंग- हिरवा

मूलांक 7: कार्यक्षेत्रात मन लागणार आहे.

मूलांक क्रमांक लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहाणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात एकटेपणा जाणवेल. तुम्ही तुमचे मत कोणाकडेही व्यक्त करणे टाळाल. जोडीदारासोबत फिरायला जाल. अडचणींमधून सन्मान मिळवून देण्यास मदत होईल.
शुभ अंक-28
शुभ रंग-आसमानी

मूलांक 8: कुटुंबासोबत नाते मजबूत होईल

मूलांक ८ लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहिल. पैशांच्या बाबतीतही विशेष काही घडणार नाही. आज पैसे गुंतवणे टाळा. कुटुंबासोबत आज वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. आजचा दिवस कुटुंबासोबत छान जाईल. मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतीत राहाल.
शुभ अंक-14
शुभ रंग-गुलाबी

मूलांक 9 : पार्टनरसोबत फिरायला जाल

मूलांक ९ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज नियोजित कामे पूर्ण होतील. तुमचे अडकलेले पैसे अचानक मिळतील, ज्यामुळे आनंदी व्हाल. कुटुंबातील सदस्य किंवा जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाल. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल.
शुभ अंक-28
शुभ रंग-आसमानी

Source link

20 जून 2024Numerology for Wednesday 20 June 2024numerology horoscopenumerology horoscope in marathiTodays Numerology 20 June in marathiकसा असेल माझा दिवस?घरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?व्यवसायात नफा होईल?
Comments (0)
Add Comment