ट्वीटर म्हणजेच X या सोशल मिडिया साइटवर सुद्धा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. महिला व्हिडिओ मध्ये बोलते आमच्या गावातील ग्रामस्थांनी आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत रस्त्याच्या कामांची तक्रार केली परंतु काहीही फायदा झालेला नाही म्हणून मग आता मी असा व्हिडिओ बनवून खुद्द पीएम मोदींना लक्ष देण्याची विनंती करते.
पुढे महिला बोलताना दिसते की माझे गाव खेडेगाव आहे आजबाजूला थोडा जंगलसारखा परिसर आहे पण तरी चांगला रस्ता तर बनलाच पाहिज.पावसळ्यात रोडवर बस पलटी होतात मोठे अपघात घडतात. त्यामुळे इथली लोक जीव मुठीत घेवून प्रवास करतात, मग मी आता थेट मोदींना विनंती करते की त्यांनी लक्ष द्यावे आणि लवकर रोड बनववा.
@chapraZila नामक ट्वीटर हॅन्डलवर लिहले आहे की हा व्हिडिओ सर्वांना पर्यंच पोहचवा. भौजी म्हणजे वहिनीने बोलेली गोष्ट पीएम मोदी पर्यंत पोहचली पाहिजे जनेतेने असाच आपला हक्क मागितला पाहिजे असे सुद्धा ट्वीट करत नमूद करण्यात आले आहे. हाच व्हिडिओ आता अनेक सोशल मिडिया युजर्सहाच व्हिडिओ पुन्हा शेअर करुन मोदींनी यांचे ऐकले पाहिजे असा आशयाने व्हिडिओ शेअर करत आहेत तर एकाने लिहले मोदींजी यांचे पण ऐका तर दुसऱ्या युजर्सने लिहले जनतेतील आवाज आहे मोदींजी ऐका. जवळजवळ १ लाख ९० हजारहून अधिकवेळा व्हिडिओ पाहिला गेला आहे तर व्हिडिओला ८ हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.