Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चार ही मृत तरुण हे शहरातील देगलूर नाका भागातील रहिवासी होते. त्यांचं वय १८ ते २० असून ते सर्वजण बारावीच शिक्षण घेत होते. मंगळवारी शेख फुझेल, काझी मुज्जमील, अफान आणि सय्यद सिद्दिक यासह अन्य एक तरुण पोहण्यासाठी झरी येथे आले. झरी येथे मोठी खदान आहे. यात नेहमी पाणी असते. सुरुवातीला या तरुणांनी फोटो काढले, त्यानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरले. विशेष म्हणजे यातील तिघांना पोहता येतं नव्हतं. पाणाच्या अंदाज न आल्याने एक जण बुडाला, त्यानंतर त्याला वाचण्याच्या नादात इतर तीन जन बुडाले. सुदैवाने या घटनेत एकजण बचावला.
घटनेची माहिती बचावलेल्या तरुणाने नातेवाईकांना माहिती दिली. जीवरक्षकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने मृत तरुणांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोहता येत नसतानाही मुलं पाण्यात उतरली आणि मोठा अनर्थ घडला. मात्र सुदैवाने यात एक जण बचावला.
झरी येथील हे खदान शहरा लगत असलेली सर्वात मोठी खदान आहे. गणेशोत्सवा दरम्यान मोठ्या गणेश मुर्तीचं विसर्जन या खदानीत करत असतात. विशेष म्हणजे झरी येथील या खदानीत दरवर्षी अशा घटना घडत असतात. सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयीन तरुण – तरुणी येथे गर्दी करत असतात. पोलिसांकडून गस्त घालण्याची मागणी येथील गावकरी करत आहे.