Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला

10

Ajit Pawar NCP Candidate First List: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याने चर्चांणा उधाण आलं आहे.

हायलाइट्स:

  • अजित पवार राष्ट्रवादी गटाची पहिली यादी जाहीर
  • राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ३८ उमेदवारांची नावं
  • यादीत वडगाव शेरीच्या सुनील टिंगरेंचं नाव नाही
Lipi

अभिजीत दराडे, पुणे: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान सध्या महायुतीने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. सर्वप्रथम भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची यादी आली. आता अजित पवार गटानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाने ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीत पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नाहीये. अजित पवार गटातील पहिल्या यादीतून सुनील टिंगरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार आहेत. तर, हडपसरमधून चेतन तुपे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी (२२ ऑक्टोबर) जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. अजित पवार गटाच्या पहिल्या यादी सुनील टिंगरे यांचे नाव नसल्याने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात चर्चांना उधाण आलं आहे.
कुछ पल के अंधेरे का अंत जल्द..; शायरीतून स्नेहलता कोल्हेंची भावनिक साद, निवडणुकीतून माघार?

वडगाव शेरी अजित पवार गटाला की भाजपला?

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांना ठेवायचा की भाजपला ठेवायचा यासंदर्भातली खलबतं गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. पोर्शे कार अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांचं नाव आल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकूणच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा मुद्दा हा पोर्शे कार अपघातात आमदाराचा कसा सहभाग होता याकडे वळविला असल्याने महायुतीला याचा फटका शहरभर बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यामुळेच भाजपने अजित पवार यांच्यासमोर खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या संदर्भातली चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. पण, भाजपच्या पहिल्या यादीत खडकवासल्याचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांचं नाव नाही आणि आता अजित पवार यांची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याने खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील अदलाबदलीच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे.

दरम्यान, काल भाजपचे माजी आमदार आणि वडगाव शेरी मतदारसंघातून इच्छुक असणारे जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जगदीश मुळे यांनी ‘लढेंगे जितेंगे’ हे व्हाट्सअप स्टेटस अपडेट करत आपण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला. जगदीश मुळीक यांच्या या स्टेटसनंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यालयात अचानक हालचाल पाहायला मिळाली. प्रचार साहित्य गोळा करण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आता वडगाव शेरीचा पेच आणखीनच वाढला आहे.

NCP Candidate First List: NCPच्या यादीतून टिंगरेंचं नाव गायब; पोर्शे प्रकरण भोवलं की BJP ने डाव साधला, पेच वाढला

अजित पवारांच्या उमेदवारांची पहिली यादी

  1. बारामती – अजित पवार
  2. येवला – छगन भुजबळ
  3. आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
  4. कागल – हसन मुश्रीफ
  5. परळी – धनंजय मुंडे
  6. दिंडोरी – नरहरी झिरवाळ
  7. अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
  8. श्रीवर्धन – आदिती तटकरे
  9. अंमळनेर – अनिल भाईदास पाटील
  10. उदगीर – संजय बनसोडे
  11. अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
  12. माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
  13. वाई – मकरंद पाटील
  14. सिन्नर – माणिकराव कोकाटे
  15. खेड आळंदी – दिलीप मोहिते
  16. अहमदनगर शहर – संग्राम जगताप
  17. इंदापूर – दत्तात्रय भरणे
  18. अहमदपूर – बाबासाहेब पाटील
  19. शहापूर – दौलत दरोडा
  20. पिंपरी – अण्णा बनसोडे
  21. कळवण – नितीन पवार
  22. कोपरगाव – आशुतोष काळे
  23. अकोले – डॉ. किरण लहामटे
  24. बसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
  25. चिपळूण – शेखर निकम
  26. मावळ – सुनील शेळके
  27. जुन्नर – अतुल बेनके
  28. मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
  29. हडपसर – चेतन तुपे
  30. देवळाली – सरोज आहिरे
  31. चंदगड – राजेश पाटील
  32. इगतपुरी – हिरामण खोसकर
  33. तुमसर – राजू कारेमोरे
  34. पुसद – इंद्रनील नाईक
  35. अमरावती शहर -सुलभा खोडके
  36. नवापुर – भरत गावित
  37. पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर
  38. मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला
नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.