Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election 2024: भाजपने विधानसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली असून आतापर्यंत पक्षाने १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. जाणून घ्या भाजपच्या दुसऱ्या यादीत कोणाला तिकीट मिळाले.
भाजपच्या दुसऱ्या यादीत कसबा पेठचा देखील समावेश आहे. येथून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कसबामध्ये काँग्रेस-भाजप- मनसे अशी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवार द्यावा अशी मागणी ब्राह्मण समाजाकडून करण्यात आली होती. मात्र २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याकडून पराभव झालेल्या रासने यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
अशी आहे भाजपची दुसरी यादी
धुळे ग्रामीण- राम भदाणे
मलकापूर- चैनसुख संचेती
अकोट- प्रकाश भारसाकले
अकोला पश्चिम- विजय अग्रवाल
वाशिम- श्याम खोडे
मेळघाट- केवळराम काळे
गढचिरोली- मिलिंद नरोटे
राजुरा- देवराव भोंगले
ब्रह्मपूरी- कृष्णलाल सहारे
वरोरा- करण देवतळे
नाशिक मध्य- देवयानी फरांदे
विक्रमगढ- हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर- कुमार आयलानी
पेन- रविंद्र पाटील
खडकवासला- भिमराव तापकीर
पुणे कॅन्टोन्मेंट – सुनील कांबळे
कसबा पेठ- हेमंत रासने
लातूर ग्रामीण- रमेश कराड
सोलापूर शहर मध्य- देवेंद्र कोठे
पंढरपूर- समाधान आवताडे
शिराळा- सत्यजित देशमुख
जत- गोपीचंद पडळकर