Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अजित पवारांची डोळे पुसण्याची केली नक्कल; पाहा कन्हेरीतील सभेत नेमके काय घडले
Maharashtra Election 2024: बारामतीत युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शरद पवारांनी अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. इतक नाही तर पवारांनी अजितदादांच्या डोळे पुसण्याची नक्कल देखील केली.
पवार म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. सुनेत्रा त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. त्यावेळची त्यांची (अजित पवार) भाषणे बघा. ते म्हटले की, समोरचे लोक भावनेला हात घालतील. तुम्हाला भावना प्रधान करतील. डोळ्यात पाणी आणून मते द्या म्हणतील पण तुम्ही बळी पडू नका. पण तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. कालच्या सभेत त्यांनी डोळे पुसले, या शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला. शिवाय भाषण मध्येच थांबवत रुमाल डोळ्याला लावत अजित पवार यांची नक्कल केली.
भाजपकडून आणखी एक यादी, पण यावेळी स्वत:ची नाही तर मित्रांसाठी सोडल्या इतक्या जागा; आठवलेंना मिळाली एक जागा
कुटुंब एकत्र कसे राहिल हे मी नेहमीच पाहिले..
मी घर फोडल्याची भाषा काल इथे झाली. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. पवार कुटुंबातील मी वडीलधारी आहे. कुटुंब एकत्र कसे राहिल हे मी नेहमीच पाहिले. घर फोडायचे पाप माझ्या आई-वडीलांनी, भावांनी मला कधी शिकवले नाही,कुटुंबातील वडीलधारी म्हणून माझ्या कुटुंबात माझे सगळे ऐकतात. मी नेहमीच घर कसे एकत्र राहिल हे पाहिले आहे. घर फोडण्याचे पाप मी करणार नाही. मी राजकारण करत असताना अन्य भावांना शेती, उद्योगंधद्यांसाठी मदत केली. त्यांच्या आशीर्वादानेच मी राजकारण करू शकलो, असे शरद पवार म्हणाले.
अजितदादांचा कंठ दाटून आला, अश्रू अनावर झाले; पक्ष सोबतच कुटुंबात पडलेल्या फुटी बाबत केले जाहीर भाष्य
शरद पवार म्हणाले
-मी शेती, दूध उद्योग पूरक कारखाने आणले दारुचे नाही.
– सगळे तुमच्याच हातात होते. मग तिकडे कशासाठी गेलात
– पक्ष, चिन्ह चोरून तिकडे गेलात, यापूर्वीही चारदा उपमुख्यमंत्री केले होतेच ना.
– मी अध्यक्ष असतानाही सुप्रियाला कोणते पद दिले का
– मी मलिदा गॅंग निर्माण केल्या नाहीत
– सगळ्या संस्थांचा कारभार तुमच्या हातात, तरीही अन्याय