Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Devendra Fadnavis On BJP Seats : देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाजपच्या किती जागा येतील, याबाबत थेट उत्तर दिलं आहे. त्याशिवाय त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
फडणवीसांचा भाजपच्या जागांबाबत मोठा दावा
एबीपीच्या शिखर संम्मेलन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधत भाजपच्या किती जागा येतील याचं उत्तर दिलं. त्याशिवाय त्यांनी महाराष्ट्र निवडणुकांबाबत अनेक गोष्टींवर चर्चा केली.महाराष्ट्र विधानसभेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, निवडणूक आव्हानात्मक आहे, पण लोकसभेनंतर परिस्थिती बदलली आहे, महाराष्ट्रातील वातावरण बदललं आहे, आता विरोधकांचा फेक नरेटिव्ह गेला आहे. या विधानसभेत भाजप १०० चा आकडा पार करेल.
Raj Thackeray : माझ्या हातात सरकार देऊन पाहा, ४८ तासांत… बाबा सिद्दीकींच्या हत्येबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे – फडणवीसांचा हल्लाबोल
फडणवीसांनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत आता वोट जिहाद होणार नसल्याचं म्हटलं. संविधानाच्या नावे जे ध्रुवीकरण केलं गेलं होतं, ते संपलं आहे. राहुल गांधी ज्यावेळी आरक्षणावर अमेरिकेत बोलतात, त्यावर नाना पटोलो याचं समर्थन करतात, यावरुन यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचं दिसतं, असं फडणवीसांनी सांगितलं.
खोके-खोके करणाऱ्या उद्धवजींना आता काँग्रेसमधून उमेदवार आयात करावा लागतो हे दुर्दैव, रामदास कदमांची टीका
आता आमचंच सरकार येणार, उपमुख्यमंत्र्यांना विश्वास
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर नंबर कमी पडल्यास शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपैकी कोणाची निवड करणार या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, आम्ही महायुती एकत्र आहोत, आमचंच सरकार येणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नकारात्मकता तयार झाली होती, त्यानंतर आम्ही सावधपणे काम केलं आणि आता सकारात्मकता आली असल्याचं ते म्हणाले.
Devendra Fadnavis : फडणवीसांनी थेट २३ नोव्हेंबरचा निकालच सांगितला, राज्यात भाजपच्या इतक्या जागा येतील; केला मोठा दावा
हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, आता हिंदुत्व शिकवण्यासाठी अबू आजमी त्यांच्यासोबत आहेत. माझ्यासोबत त्यांना हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. जे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचं पाहिलं, जे शिवसेनेचं पाहिलं, ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी संपवलं आहे, आता केवळ भाषणांमध्ये ते असल्याची टीका फडणवीसांनी केली.