Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mumbai Local Mega Block: दिवाळीच्या प्रवासाला रेल्वेचा ‘ब्लॉक’; मध्य रेल्वेवर ३ दिवस रविवार वेळापत्रक
Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेने दीपावली पाडव्यापर्यंत ‘रविवार वेळापत्रका’नुसार गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील अनेक कंपन्या, कार्यालये गुरुवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी सुरू होती. यामुळे कामावर लवकर जाऊन घरी लवकर परतण्यासाठी नोकरदार वर्गाने सकाळी लवकरच रेल्वे स्थानक गाठले. मात्र, रेल्वे स्थानकांवर पोहोचल्यावर काही लोकल रद्द आणि काही लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या. रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर गुरुवारी सुट्टीच्या अर्थात ‘रविवार वेळापत्रका’नुसार रेल्वेगाड्या चालवण्यात येत असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली.
‘३१ ऑक्टोबर, १ आणि २ नोव्हेंबर रोजी उपनगरी रेल्वेगाड्या ‘रविवार वेळापत्रका’नुसार धावणार आहेत. कृपया प्रवास करताना त्यानुसार नियोजन करावे,’ अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या ‘एक्स’वरून देण्यात आली. गुरुवारी सकाळपासून ‘रविवार वेळापत्रक’ लागू झाले. मात्र दुपारनंतर याची अधिकृत माहिती समाजमाध्यमांवर देण्यात आली. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती.
Devendra Fadnavis: राज ठाकरेंना महायुतीत वाव नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती
‘रविवार वेळापत्रका’मध्ये वातानुकूलित लोकल फेऱ्याही रद्द करण्यात येत असल्याने एसी लोकलचे तिकीट-पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ठाणे रेल्वे स्थानकात काही रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलचे तिकीच काढले, मात्र एसी लोकल रद्द असल्याने प्रवासी संतापले. काही प्रवाशांनी ठाणे रेल्वे स्थानकातील स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयावर धडक दिली. प्रवासी आणि रेल्वे अधिकारी यांच्यात वाद झाला. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढत वाद मिटवला.
रेल्वे इंजिनाचा ‘रिव्हर्स गिअर’! नाशिक मध्यमध्ये अंकुश पवाराच्या माघारीची चर्चा, तर पूर्वमधील उमेदवारावरही दबाव
पश्चिम रेल्वेवरही खोळंबा
पश्चिम रेल्वेने गुरुवारबरोबरच शुक्रवारीही ‘रविवार वेळापत्रका’नुसार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवाळी पाडव्यानिमित्त मित्र-परिवार आणि नातेवाईकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीला तोंड द्यावे लागणार आहे. शनिवारी नियमित वेळापत्रकानुसार लोकल फेऱ्या असणार आहे. भाऊबीज रविवारी आल्याने प्रवाशांना गर्दीतूनच वाट काढावी लागणार आहे.