Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election 2024: नांदेड जिल्ह्यातील एका अपक्ष उमेदवाराने स्वत:ची गाडी जाळली आणि पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पोलिस तपासात जे काही समोर आले ते वाचून तुम्ही डोक्याला हात लावाल.
नांदेडमध्ये विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नऊ मतदान क्षेत्रात अनेकजण आपले भाग्य आजमावत आहेत. कंधार तालुक्यातील करतळा येथील परसराम कदम यांनी मुखेड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. २ नोव्हेंबर रोजी रात्री सवा सहा वाजेच्या सुमारास मुखेड ते बाऱ्हाळी रोड परसराम दत्ता कदम यांनी पुतण्या अक्षय लहू कदम याच्या मदतीने स्वतः जवळील असलेली टाटा सफारी वाहन क्रमांक ( एमएच २६ एल २७७५) डिझेल टाकून जाळली. त्यानंतर काका पुतण्याने मुखेड पोलिसांना फोन करून आमची गाडी अज्ञाताने जाळली अशी माहिती दिली.
Usman Encounter: दहशतवादी कमांडरला यमसदनी पाठवले; ‘ऑपरेशन उस्मान’मध्ये बिस्किटांचाही असामान्य उपयोग
घटना गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शिवाय अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवली. तपासा दरम्यान पोलिसांना मात्र संशय येतं होता. पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पुतण्या अक्षय कदम याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्या दोघांचा बनाव उघडकीस आला.
स्तुतीसुमने ऐकल्यानंतर नितीश कुमारांचा आनंद गगनात न मावेना; थेट भाजपच्या माजी खासदाराच्या पाया पडले
निवडणुकीत प्रसिद्धीसाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली काका पुतण्याने दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुखेड पोलिसांनी अपक्ष उमेदवार परसराम कदम आणि त्याचा पुतण्या अक्षय कदम या दोघा विरोधात कलम २८७, २१७, ३२४(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच समर्थन मिळावे यासाठी उमेदवाराने ही शक्कल लढवल्याची चर्चा आहे. प्रसिद्धीसाठी उमेदवारने अश्या प्रकारे कृत्य केल्याचे उघड झाल्याने मुखेड मध्ये चर्चेचा विषय बनला आहे.