Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात; भाजप नेत्याचं विधान, महायुतीत वादाची ठिणगी

8

BJP Vs ShivSena: ठाण्यात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. येथे भाजपच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्षांनीच मुख्यमंत्र्यांबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे येथे भाजप आणि शिंदेसेनेत वाद होण्याची शक्यता आहे.

Lipi

प्रदीप भणगे, डोंबिवली: ठाणे जिल्हा हा शिवसेना – भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, दोन्ही पक्षातील पदाधिकारी यांचे पटताना दिसत नाही. कल्याण पूर्व विधानसभेत शिंदेच्या सेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. तर, कल्याण पश्चिम विधानसभेत भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षात पटत नसल्याचे दिसून आले आहे. यातच आता उल्हासनगरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप यात वादाची ठिणगी पडली आहे. ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात, असं खळबळजनक विधान भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरमध्ये भाजप आणि साई पक्षाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे भाषण करत होते. यावेळी उल्हासनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीचा दाखला देत असतानाच अचानक त्यांनी “आता कुणीही गद्दार राहिलेलं नाही, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात. राजकारणाची परिभाषा बदलली आहे. ज्यांना आम्ही काल गद्दार म्हणत होतो, ते आज आमच्या पक्षात सहभागी झाले आहेत, त्यांना आज आम्ही खुद्दार म्हणतो. काळाने हा बदल केला आहे”, असं प्रदीप रामचंदानी म्हणाले.
Sada Sarvankar: मी उमेदवारी अर्ज मागे घेईल, जर… सदा सरवणकरांनी पेच वाढवला, राज ठाकरेंसमोर ठेवली मोठी अट
त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये मोठी खळबळ माजली. भाषण संपल्यानंतर रामचंदानी यांना याबाबत विचारलं असता, “मी तसं बोललोच नसून विरोधक ज्यांना गद्दार म्हणतात, ते मुख्यमंत्री बनतात. ते गद्दार नव्हे, तर खुद्दार असतात” असं मी म्हटल्याचा दावा रामचंदानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावं लागेल.

Mahayuti: ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात; भाजप नेत्याचं विधान, महायुतीत वादाची ठिणगी

दरम्यान, उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झाली असून जोपर्यंत जिल्हाध्यक्ष रामचंदानी हे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता भाजपा आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांचं काम करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलानी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप आणि सेनेत पटत नसल्याचे उघड होत आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.