Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पण थिएटरमध्येच येऊन सिनेमा बघा! मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी असा आहे मास्टर प्लॅन

5

multiplexes challenge direct ott :ओटीटीच्या युगात कुठेही आणि कधीही कन्टेंट पाहण्याची सुविधा मिळाल्यामुळे प्रेक्षकांचा कल ऑनलाइन मनोरंजनाकडे झुकलेला आहे. परिणामी सिनेमागृहाला ओटीटीनं आव्हान दिलंय. तरी मल्टिप्लेक्स सिनेमगृहांनीही हार मानलेली नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक ऑफर्स आणि सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या जोरावर मल्टिप्लेक्स आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलत्या काळात मल्टिप्लेक्सही कात टाकत थेट ओटीटीला आव्हान देण्यास सज्ज होतंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गेल्या पाच वर्षांत देशभतील २५ टक्क्यांहून अधिक मल्टिप्लेस सिनेमागृह आर्थिक नुकसानामुळे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होते. छोट्या शहरातील मल्टिप्लेक्स सिनेमागृहं ओस पडली होती. प्रेक्षकांचा ओढा तुलनेनं कमी झाला होता. परिणामी, ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मल्टिप्लेक्स सिनेमागृहांसमोर आव्हानं उभी राहिली आहेत. त्यामुळे आता मल्टिप्लेक्सनं प्रेक्षकांना पुन्हा स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी मल्टिप्लेक्स व्यावसायिक ‘सिनेमॅटिक व्ह्यूविंग टेक्नॉलॉजी’पासून विविधांगी ‘तिकीट सवलतीचे प्रयोग’ अशा गोष्टी करत आहेत. सिनेमागृहाच्या मोठ्या पडद्यावर चित्रपट अनुभवण्याचं वेगळंच आकर्षण आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही काळ सिनेमागृहांचा प्रभाव कमी झाला असला तरीही सिनेमागृहं अजूनही अनेकांच्या हृदयात आपली खास जागा राखून आहेत.

अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ सारख्या सिनेमांनी आणि काही जुन्या चित्रपटांच्या पुनःप्रदर्शनानं सिनेमागृहांच्या आकर्षणाचं महत्त्व दाखवून दिलं आहे. यासंदर्भात ‘पीव्हीआर आयनॉक्स’चे मुख्य सल्लागार आलोक टंडन यांनी ‘मुंटा’शी खास संवाद साधला. ‘सिनेमागृहात बसून मोठ्या पडद्यावर, इमर्सिव्ह आवाज आणि प्रभावी दृश्यांमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. थिएटरमध्ये चित्रपट पाहताना प्रेक्षकांना एकत्र आनंद घेता येतो. हा अनुभव ओटीटी प्लॅटफॉर्मवर घेता येत नाही. हा सामूहिक अनुभव आणि भावनिक संवाद आहे. प्रेक्षकांची गरज ओळखून आम्ही आता उत्तमोत्तम बदल घडवून आणण्यावर भर दिला आहे. मोठी स्क्रीन, अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, उच्च दर्जाचा आवाज; विशेषत: सवलतीच्या दरात आम्ही तिकीट देत आहोत’; असं आलोक टंडन म्हणाले.

अरुंधतीसाठी मधुराणी प्रभुलकरचं हृदयाला भिडणारं पत्र; म्हणाली,’गेली पाच वर्ष तू…’

सातत्यानं सिनेमे पाहणाऱ्या जाणकार प्रेक्षकांना सवलतीच्या दरात तिकीट मिळावं म्हणून आम्ही ‘पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट’ हा आमचा नवा लॉयल्टी प्रोग्राम सुरू केला आहे. त्यात प्रेक्षकांना सवलतीच्या दरात सिनेमाचं तिकीट मिळतं. त्यात इतरही विशेष ऑफर्स समाविष्ट असतात. तसंच ऑनलाइन तिकिटविक्री, मोबाइल अॅप्स सारख्या विविध पर्यायांचा वापर करूनही प्रेक्षकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.
– आलोक टंडन, मुख्य धोरणात्मक सल्लागार (पीव्हीआर आयनॉक्स)

पण थिएटरमध्येच येऊन सिनेमा बघा! मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी असा आहे मास्टर प्लॅन

‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’ यानंतर आणखी एक महिलाकेंद्रीत चित्रपटाची चर्चा, ‘गुलाबी’चा टीझर चर्चेत

‘आयमॅक्स’, ‘फोर डीएक्स’, ‘डॉल्बी अॅटमॉस’चा प्रभाव!
बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये आयमॅक्स, फोर डीएक्स आणि डॉल्बी अशा तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे प्रेक्षकांना नवा अनुभव मिळतोय. उदाहरणार्थ, फोर डीएक्स आणि एमएक्स फोरडी स्क्रीन्समुळे प्रेक्षकांना चित्रपटातील दृश्यांमधील बारकावे पाहता येतात. हल्ली अनेक सिनेमांमध्ये व्हिएक्सएक्स दृश्यांचं प्रमाण वाढलं आहे. तसंच थ्रीडी सिनेमेही प्रदर्शित होत आहेत. अशा सिनेमांचा अनुभव घेताना प्रेक्षकांना पडद्यावर दृश्यं खरीखुरी वाटावी यासाठी या नव्या तंत्रज्ञांनाचा वापर मल्टिप्लेक्समध्ये होतोय. डॉल्बी अॅटमॉसच्या आवाजामुळे संपूर्ण सिनेमा हॉलमध्ये एक त्रिमितीय ध्वनी अनुभवता येतो. अलीकडच्या वर्षांत प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ सिनेमाच्या पाण्यामधील दृश्यं केवळ मोठ्या पडद्यावर अधिक आकर्षक वाटतात. तसंच गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘भूलभुलैय्या ३’ सारखा हॉरर कॉमेडी सिनेमा डॉल्बी अॅटमॉसमुळे अधिक प्रभावशाली वाटत असल्याचं प्रेक्षकही सांगतात.

* आधुनिक तंत्रज्ञान : आयमॅक्स, फोर डीएक्स आणि डॉल्बी अॅटमॉस यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतोय. त्यामुळे चित्रपट बघण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरतो.

* तिकीटदर : डायनॅमिक प्राइसिंगसारख्या मॉडेल्सचा वापर करून सर्व आर्थिक स्तरांतील प्रेक्षकांसाठी तिकीटदर उपलब्ध करून दिले जात आहेत.

* विशेष स्क्रीनिंग्स : फिल्म फेस्टिव्हल, जुन्या क्लासिक सिनेमांचं पुनःप्रदर्शन आणि फिल्ममेकर्ससह प्रश्नोत्तर सत्र यांसारखे कार्यक्रम आयोजित करणे.

* वैविध्यपूर्ण कन्टेंट : नवीन पिढीच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अॅनिमे, परदेशी सिनेमे आणि स्वतंत्र दिग्दर्शकांचे सिनेमे प्रदर्शित करण्यावर भर दिला जातोय.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.