Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पोस्टल बॅलेटनंतर ईव्हीएमची मोजणी सुरु झाली अन्… ठाकरे गटाच्या युवा आमदाराने सांगितला मतमोजणीचा ‘तो’ किस्सा
Varun Sardesai Slams EC over EVM: यावेळी महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली आहे. यामुळे सध्या EVM प्रणाली विरोधकांच्या निशाण्यावर आहे. तसेच राज्यात यंदा वाढलेला मतटक्क्यावरुनही राज्यातील दिग्गज नेत्यांकडून आयोगावर निशाणा साधला जात आहेत. यामध्येच शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित युवा आमदार वरुण सरदेसाई यांनीही EVMवर संशय व्यक्त केला आहे.
वरुण सरदेसाई म्हणाले, निकालापूर्वी आलेले सर्व एक्झिट पोल खोटे ठरवून हा विचित्र असा निकाल लागला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याआधी अनेक मतदारसंघामध्ये विरोधी पक्षांना समसमान मते मिळाली असल्याचे सांगितले आहेच. पण यात महत्त्वाचा विषय मांडायचा आहे तो म्हणजे पोस्टल बॅलेट संदर्भात. ‘मी जी आकडेवारी दाखवतोय ती निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतलेली आहे,’ असेही सरदेसाईंनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाणांचा ईव्हीएमवर संशय, निवडणूक आयोगावरही मोठा आरोप; आंतरराष्ट्रीय समिती नेमण्याची केली मागणी
सरदेसाईंनी पोस्टल बॅलेटमधील आघाडीची तफावतही आकडेवारीतून दाखवली आहे. ते म्हणाले, लोकसभेमध्ये पोस्टल बॅलेट मध्ये महाविकास आघाडीला ३१ जागांवर लीड होता आणि महायुतीला १६ जागांवर लीड होता. विधानसभा निवडणूक २०२४मध्ये इतका एवढा मोठा फरक पडला की १४३ जागांवर महाविकास आघाडी पुढे होती आणि महायुती १४० जागांवर पुढे. तर अन्य पाच जागांवर इतर पुढे आहेत. पण नंतर ईव्हीएमची मोजणी सुरु झाली आणि महाविकास आघाडी १४३ वर पुढे होती, ती एकदम ४६ वर येऊन कशी थांबली?
एकूण मतदान आणि त्यातील आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांचं मतदान पाहिलं तर तुम्हाला समजेल. आदित्य ठाकरे यांना पोस्टलमध्ये ५१ टक्के मतं मिळाली आणि पोस्टलमध्ये मिलिंद देवरा यांना २१ टक्के मतं मिळाली आहेत. पण ईव्हीएममध्ये जर विषय सुरू झाला तर आदित्य ठाकरे यांची ६० टक्के मतं कमी झाली आणि मिलिंद देवरा यांचे ६० टक्क्यांनी मतं वाढली आणि म्हणून आदित्य ठाकरे केवळ सहा टक्क्यांच्या फरकाने निवडून येतात. पोस्टलमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे असतो. पण तो ईव्हीएममधून मागे पडतो.
यासोबतच वरुण सरदेसाईंनी दिग्गज नेत्यांच्या मतटक्क्यामधील तफावतीवरही बोट ठेवले आहे. नाना पटोले यांना पोस्टलपेक्षा ईव्हीएमवर १३ टक्क्यांनी मतं कमी होतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांना पोस्टल मध्ये २८ टक्के मतदान होतं आणि ते ४२ टक्क्यांनी पुढे होतात आणि नंतर ईव्हीएमवर जेव्हा मतदान मोजलं जातं तेव्हा ते पाच टक्क्यांनीच पुढे राहतात, याचप्रकारे रोहित पवार यांचा सुद्धा निसटता विजय होतो, असे सरदेसाई म्हणाले. सगळ्यात इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात यांचे पोस्टल मध्ये त्यांना ४० टक्के मतं त्यांना जास्त मिळाले आणि नंतर ईव्हीएम मध्ये मोजणी होते तेव्हा मायनस पाच अशी त्यांची हार होते.
पोस्टलमध्ये महाविकास आघाडीचे मत जास्त असतात.