Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारवर पोलीसांनचा छापा 49 तळीराम पोलीसांच्या ताब्यात तर लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

16

सोलापूर,दि.१३ :- सोलापूरात आज पहाटे बेकायदेशीर सुरु असलेल्या आर्केस्ट्राच्या नावाखाली डिस्को डान्सबारवर सोलापूर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.सोलापूर : सोलापूरात रविवारी पहाटे बेकायदेशीर सुरु असलेल्या डान्सबारवर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकत कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई सोलापूरातल्या विजापूर रोडवरील गुलमोहर आर्केस्ट्रा बारवर करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात तळीरामांची गर्दी होती. पोलिसांना पाहताच पळापळी सुरू झाली. मात्र सर्व दरवाजे बंद असल्याने ४९ तळीरामांंना ताब्यात घेण्यात आले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर आर्केस्ट्रा बारमध्ये रात्री तीन वाजता नृत्यांगनांवर काही जण पैसे उधळत असल्याचा प्रकार सुरू होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी छापा टाकत कारवाई केली.या कारवाईत ४९ लोकांना ताब्यात घेण्यात आले असून दोन लाख ७१ हजार ३८० रुपयांच्या रोख रकमेसह ५९ लाख ७८ हजार ८८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.