Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शाहरुख खानचे चाहते केवळ देशातच नव्हे तर जगभरात पसरले असल्यामुळे ‘पठाण’ने प्रदर्शनानंतर अवघ्या १० दिवसांत जवळपास ७२५ कोटी रुपयांचे जगभरात कलेक्शन केले आहे. शाहरुखच्या एका जबरा फॅनचीही माहिती समोर आली आहे. बांग्लादेशच्या या चाहत्याने ‘पठाण’च्या क्रेझची हद्द ओलांडली आहे. बांग्लादेशमध्ये हा चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी तो १३० किलोमीटर अंतर पार करुन आला आहे.
‘पठाण’ परदेशात २ हजार ५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. काही कारणास्तव हा चित्रपट बांग्लादेशात प्रदर्शित झालेला नाही. पण शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ एवढी आहे की तो कसाही असला तरी तो चित्रपट बघायलाच हवा असे त्यांचे म्हणणे आहे. असाच एक चाहता ‘पठाण’ पाहण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह बांगलादेशच्या ढाका शहरातून भारतातील त्रिपुराला पोहोचला. तेही फक्त थिएटरमध्ये ‘पठाण’ पाहण्यासाठी. आगरतळा येथील चित्रपटगृहाचे मालक सतदीप साहा यांनी ही माहिती दिली आहे.
अजून ५ दिवस! ‘पठाण’समोर गुडघे टेकतील ‘बाहुबली २’ ‘केजीएफ २
सतदीप साहा यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘हे खूप छान आहे. पठाणला पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह बांग्लादेशातून लोक भारतात येत आहेत. सतदीपने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत, त्यांच्यामुळे थिएटर पुन्हा एकदा जिवंत झाले आहेत. तो लिहितो, ‘रुपसी सिनेमा, आगरतळा येथे आल्याबद्दल धन्यवाद.’
चाहत्यांची अशी क्रेझ क्वचितच पाहायला मिळते. शुक्रवारपर्यंतच्या १० दिवसांत ‘पठाण’ने देशात हिंदी भाषेत ३६३.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तेलगू आणि तमिळ मिळून चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने देशात ३७९.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.