Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एन.सी.एल. परिसरातुन चंदनाच्या झाडाची चोरी

8

पुणे,दि.०५ :- एन.सी.एल. येथील पाषाण,परिसरातील दि ०५ रोजी पाहाटे ३ ते ६ दरम्यान लहान पाच चंदनाचे झाड अज्ञात चोरटय़ाने कापून नेल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहरात चंदनाच्या झाडांच्या चोरीचे प्रकार वारंवार घडत असून यामागे चोरटय़ांची टोळी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी एन.सी.एल.येथ कामावर असलेल्या सिक्युटी. सुपरवायजर म्हणुन काम करत असलेल्या धनाजी पाटील  ४६ वर्षे, रा. लोहगाव, पुणे यांनी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरटय़ाविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आहे चंदनाच्या झाडाला बाजारात चांगली मागणी असल्याने चोरटय़ांनी अशी झाडे लंपास करण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते आहे. व पुढील तपास एपीआय .बाबासाहेब झरेकर करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.