Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विमानाने पुण्यात येऊन आयफोन चोरणारी टोळी पुणे शहर पोलीसांच्या जाळ्यात

6

पुणे,दि.२८:- विमानाने पुण्यात येऊन हाय प्रोफाइल कॉन्सर्टमधून मोबाइल चाेरणाऱ्या टोळीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या. त्यांच्याकडून ३० लाख २७ हजार रुपयांचे ३९ मोबाइल जप्त केले आहेत. त्यात २१ आयफोन व इतर फोन
असद गुलजार महंमद (वय ३२, रा. दिल्ली), निजाम बाबू कुरेशी (वय ३५, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश), शाहबाज भोले खान (वय २६, रा. दिल्ली), राहुल लीलीधर कंगाले (वय ३०, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) आणि नदीम इब्राहिम मलीक (वय ४० रा. दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २८ लाख ४० हजार रुपयांचे ३४ मोबाइल जप्त केले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी मोबाइल फोन चोरी करणाऱ्या प्रशांत के. कुमार (रा. शिमोगा, कर्नाटक) याच्याकडून १ लाख ८७ हजार रुपयांचे एकूण ५ मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
नगररोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोबाइल चोरी होत असल्याचे तक्रारी येत होत्या. त्यानुषंगाने पोलिसांचे एक पथक कार्यक्रमस्थळी गस्त घालत होते. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अविनाश शेवाळे यांना असद महंमद हा संशयितरीत्या फिरताना दिसला. त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आम्ही कार्यक्रमामध्ये मोबाइल फोन चोरी करण्यासाठी दिल्ली येथून आलो असून, माझे साथीदार पुणे स्टेशन येथील मीलन हॉटेलमध्ये उतरल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या चार साथीदारांना हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चोरीचे महागडे मोबाइल मिळाले.
एकुण ३० लाख २७ हजार रुपयांचे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर विलास सोंडे पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती संगीता माळी, पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे, समु चौधरी, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, शिवराज चव्हाण यांचे पथकाने केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.