Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचा छापा,17 जण पोलिसांच्या जाळ्यात

21

पुणे,दि.०५ :- पुणे शहर परिसरातील गोसावी वस्ती, कर्वेनगर,परीसरात बेकायदेशीरपणे एका ठिकाणी काही इसम १३ पानी रम्मी जुगार खेळत व खेळवत असलेल्या जुगार अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी १७ जणांनान ताब्यात घेऊन ४० हजार ६० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवार (दि.०४) रोजी केली आहे.अलंकार पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ४० हजार ६० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १७ जण जुगार खेळताना मिळुन आलेले विरूध्द अलंकार पोलीस स्टेशन येथे गुरनं. ६७ / २०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता अलंकार पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर. रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, अजय राणे, इम्रान नदाफ, अमैय रसाळ, संदीप कोळगे, किशोर भुजबळ, ओकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.