Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Maharashtra Covid Second Wave: महाराष्ट्रातील करोनाची दुसरी लाट नियंत्रणात!; ‘असा’ आहे ताजा अहवाल

18

हायलाइट्स:

  • मंत्रिमंडळासमोर कोविड स्थितीवर अहवाल सादर.
  • राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आता नियंत्रणात.
  • सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट २.४४ टक्क्यांवर.

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे राज्याचा साप्ताहिक सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट २.४४ टक्के इतका खाली आला आहे. त्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कोल्हापूर, रत्नागिरीतून समाधानकारक बातमी आली असून सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील करोना स्थिती अजूनही चिंता वाढवणारी आहे. ( Maharashtra Covid Second Wave Update )

वाचा:करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत CM ठाकरेंचा गंभीर इशारा; भाजपला सुनावले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोविड संसर्गाची सद्यस्थिती आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा विस्तृत तपशील सादर करण्यात आला. यात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दिलासा देणारे चित्र पुढे आले आहे. राज्यात अनलॉक प्रक्रिये अंतर्गत निर्बंध शिथील करण्यात आले असताना ताज्या अहवालातील पॉझिटिव्ह माहिती कोविड विरोधी लढ्याला बळ देणारी अशीच आहे.

वाचा:‘भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’

कोविड बाबत अहवालात काय म्हटलंय?

१. कोविडची दुसरी लाट: कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आली आहे.
२. शून्य रुग्ण – नंदूरबार जिल्हयात सध्या एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही.
३. दहापेक्षा कमी रुग्ण – राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे.
४. शंभरपेक्षा कमी रुग्ण – राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे.
५. सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे- सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग.
६. राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे.
७. राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरीतील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

वाचा: भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड पालिकेत ACBचा छापा; भर बैठकीतच…

लसीकरण सद्यस्थिती :

– राज्यात आजघडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत.
– राज्यातील ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के नागरीकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २५ टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे.
– राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या आहेत. हा देशातील उच्चांक आहे.
– १४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यात एकाच दिवशी नऊ लाख चौसष्ट हजार नागरीकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

राज्य नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापर, हाताची स्वच्छता व सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन या अहवालाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

वाचा: महाराष्ट्रात तालिबानी राजवट आहे का?; ‘त्या’ नोटीसवर भाजपचाही सवाल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.