Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महसूल व वन विभाग तलाठी पदभरतीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; यादिवशी होणार परीक्षा

5

Maharashtra Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येणार आहे.

सदर तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी ही परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असून, ही परीक्षा ३ सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.

परीक्षेच्या नियोजित तारखा खालील प्रमाणे :

१७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३
२६ ऑगस्ट २०२३ ते २९ ऑगस्ट २०२३
३१ ऑगस्ट २०२३ आणि १ सप्टेंबर २०२३
४ सप्टेंबर २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३
८ सप्टेंबर २०२३ आणि १० सप्टेंबर २०२३
१३ सप्टेंबर २०२३ आणि १४ सप्टेंबर २०२३

(वरील सर्व तारखांना सत्राची वेळ)
सत्र १ : सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ : दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ : सायंकाळी ४.३० ते ६.३०

(परीक्षेचे नियोजन आणि इतर माहिती शासनाच्या वतीने अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आली आहे.)

परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे :

  • सदर भरतीमधील जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राचे नाव किमान ५ ते ६ सहा दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल.
  • परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल.
  • या बाबतीतील माहिती उमेदवारांना मोबाईल, ई-मेल, आणि अर्जासाठी वापरण्यात आलेल्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात येईल.

परीक्षेचे स्वरूप :

  • तलाठी पदभरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण, अशी एकूण २०० गुणांची परीक्षा उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे.
  • प्रत्येक विषयाच्या विभागात २५ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील.
  • सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान राहील.
  • निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.

पात्रता :

  • अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय असावा
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे
  • मागासवर्गीय उमेदवार १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४३ वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा.
  • पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कामाल वयोमर्यादा ५५ वर्षे राहील.
  • स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आणि सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी ४५ वर्षे असेल.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी (४० टक्के दिव्यांगत्व असल्यास आणि प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य) वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष ठेवण्यात आली आहे.
  • प्रकल्प आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे .
  • माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट हि सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलातील सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्ष इतकी राहील.
  • तसेच, दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यत राहील.

आवश्यक कागदपत्रे :

  1. उमेदवाराने प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना उमेदवाराने संबंधित कागदपत्र आणि दाखले पीडीएफ (PDF) स्वरुपात अपलोड करणे अत्यावश्यक आहे.
  2. उमेदवाराने अर्जातील नावाचा पुरावा म्हणून (एसएससी किंवा तस्यम) गुणपत्रिका सादर करणे गरजेचे आहे.
  3. वयाचा आणि शैक्षणिक पात्रतेचा पुरावा.
  4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
  5. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर (NCL) प्रमाणपत्र.
  6. पात्र दिव्यांग व्यक्ती/माजी सैनिक/खेलाडू/अनाथ/प्रकल्प अथवा भूकंपग्रस्त/ अंशकालीन पदवीधर/ नावात बादल झाला असल्याचा पुरावा.
  7. वरील प्रमाणपत्र शासनाच्या विहित संकेतस्थळावर सादर केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.

सर्वसाधारण पण महत्त्वाचे :

  • सदर अर्ज फक्त ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार आहे.
  • उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी किंवा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
  • शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच उमेदवार अर्ज सादर करू शकतील.
  • अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या वेळेत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख लक्षात घेऊन उमेदवाराने दिलेय वेळेत अर्ज आणि शुल्क भाराने बंधनकारक राहील.

जिल्हा केंद्र निवडताना :

  • प्रस्तुत परीक्षेसाठी विविध केंद्रांचा तपशील http://mahabhumi.gov.in वर परीक्षा योजना/पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
  • अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • जिल्हा परीक्षा केंद्र बदलाची विनंती कोणत्याही परिस्थितीत किंवा कारणास्तव मान्य केली जाणार नाही.

तलाठी पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी http://mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.