Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

समता सामाजिक संस्था’ यांच्या वतीने याही वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

40

पुणे:आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा
पुणे शहरातील ‘समता सामाजिक संस्था’ यांच्या वतीने याही वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दिनांक ५ सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथे संपन्न झाला.शहरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.आझम कॅम्पसमधील अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे उपक्रमशील प्राचार्य श्री राज मुजावर सर यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सरांनी वर्षभर गरीब,होतकरू,गरजू विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम प्रशालेत राबवले.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री विजय जनार्दन भोसले यांनी सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले.येणाऱ्या काळात आपण प्रशालेत विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी अनेक उपक्रम राबवणार आहोत असे यावेळी सरांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.