Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वेश्याव्यवसायावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभा

75

पुणे,दि.०८:- वेश्या व्यवसाय करुन घेणार्या टोळीचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश केला आहे.पुणे शहरातील लोणीकंद येथील हॉटेल मनोरा येथे पथकाने छापा टाकून सहा तरुणींची सुटका केली.याप्रकरणी २ मॅनेजरांना अटक केली आहे.
प्रज्योत हिरीआण्णा हेगडे (वय २७, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश शाम शेट्टी (वय २९, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत आरोपींविरोधात सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस रेश्मा गणपत कंक यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोणीकंद मध्ये हॉटेल मनोरा लॉजिंग बोर्डिंग अँड रेस्टॉरंट येथे तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने संबधित ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. हॉटेलमध्ये सहा तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांना २ मॅनेजरांना अटक केली.ही कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव एपीआय अश्‍विनी पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोट एपीआय राजेश माळेगावे, अजय राणे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, सागर केकाण, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशार भुजबळ, इम्रान नदाफ, ओंकार कुंभार, इरफान पठाण, रेश्मा कंक यांनी केली आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

Leave A Reply

Your email address will not be published.