Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात आगीच्या 23 घटन

8

पुणे,दि.१३:- पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दि.१३ रोजी रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांमुळे आगीच्या २३ घटना घडल्या. या घटनांमध्ये बरेच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे या आगीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात रात्री साडेसात वाजल्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आगीच्या २३ घटनांची नोंद झाली.
या घटनांमध्ये कोठेही जखमी किंवा जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. गतवर्षी शहरात दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे २३ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या.

आगीच्या घटनांची वेळ, स्थळ

१) वेळ राञी ०७•३८ – रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग

२) वेळ राञी ०७•४० – कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग

३) वेळ राञी ०८•१८ – वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग

४) वेळ राञी ०८•२४ – कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचरयाला आग

५) वेळ राञी ०८•५० – नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग

६) वेळ राञी ०८•५२ – घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिराजवळ झाडाला आग

७) वेळ राञी ०८•५७ – कोंढवा, शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग

०८) वेळ राञी ०८•५८ – वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग

०९) वेळ राञी ०९•०० – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग

१०) वेळ राञी ०९•१३ – केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग

११) वेळ राञी ०९•२७ – आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग

१२) वेळ राञी ०९•३१ – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर तिसरया मजल्यावर आग

१३) वेळ राञी ०९•३२ – गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग

१४) वेळ राञी ०९•५० – हडपसर, रासकर चौक येथे एका घरामध्ये आग

१५) वेळ राञी ०९•५१ – पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज १ येथे घराच्या गॅलरीमध्ये आग

१६) वेळ राञी १०•०८ – रास्ता पेठ, आगरकर शाळेजवळ छतावर कागदाला आग

१७) वेळ राञी १०•०९ – लोहगाव, शिवनगर, वडगाव शिंदे रोड इमारतीत गॅलरीमध्ये आग

१८) वेळ राञी १०•२३ – विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ इमारतीत गॅलरीत आग

१९) वेळ राञी १०•२८ – वडारवाडी, पांडव नगर येथे घरामध्ये आग

२०) वेळ राञी १०•३४ – धानोरी, विठ्ठल मंदिर येथे गवताला आग

२१) वेळ राञी १०•४३ – गुरुवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ घरामध्ये आग

२२) वेळ राञी १०•५२ – बी टी कवडे रोड, सोलेस पार्कसमोर घरामध्ये आग

२३) कोंढवा, शिवनेरी नगर, ब्रम्हा एवेन्यू सोसायटी येथे गच्चीवर टॉवरला आग

अग्निशमन दल नियंत्रण कक्षात राञी ०७•३८ ते राञी १२•०० वाजेपर्यंत फटाक्यामुळे आगीच्या २३ घटनांची नोंद असून आत्तापर्यंत कोठे ही जखमी वा जिवितहानी नाही

Leave A Reply

Your email address will not be published.