Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.२०:- बाणेर परिसरातील एका कंपनीतुन कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरून तरुणावर गोळीबार केल्यची घटना बाणेर रोड येथे एका होटेल समोर घडली. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.आकाश बाणेकर (वय २८, रा. लवळे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजरात कॉलनी,कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदित्य दिपक रणावरे आणि सागर लक्ष्मण बनसोडे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.
बाणेर रस्त्यावर एका होटेल जवळ रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश पिंपळकर आणि रोहित ननावरे हे दोघे बाणेर येथील एका कंपनीत कामाला आहेत.
कंपनीने रोहित याला कामावरुन काढून टाकले़ नीलेशमुळे आपल्याला कामावरुन काढून टाकले, या गैरसमजुतीतून त्याने फिर्यादी यांना एका हॉटेलजवळ बोलावून घेतले होते.
यावेळी त्यांच्यात वाद झाला.व आदित्य याने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यातील गोळी आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी यांच्या शोध घेऊन दोघांना अटक केली आहे पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करत आहे
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!