Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या अर्चना कटके यांना बाल स्नेही 2023 पुरस्कार

12

पुणे,दि.२५ :- पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील भरोसेलच्या अर्चना कटके, सहा. पोलीस निरीक्षक, विशेष बाल सुरक्षा पथक, भरोसा सेल, गुन्हे शाखा, यांना बालकांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्या बद्दल राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालविकास आयुक्तालय, युनिसेफ यांच्या वतीने बाल स्नेही पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकास, बाल विकास हक्क संरक्षण, सुरक्षा व आरोग्य इत्यादी बाबतीत विविध प्रशासकीय विभागा सह बालगृह, बालकल्याण समिती आदी कार्य करत असतात. बालकांसाठी सकारात्मक पध्दतीने मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना “बालस्नेही ” पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालविकास आयुक्तालय, युनिसेफ यांनी मंगळावर २२ नोव्हेम्बर रोजी आयोजित केला होता. पुरस्काराचे यंदाचे पहिलेच वर्ष असून पुणे शहर मधील पोलिसांच्या भरोसा सेलच्या अर्चना कटके, सहा. पोलीस निरीक्षक, विशेष बाल सुरक्षा पथक, भरोसा सेल, गुन्हे शाखा, बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली. राज्य बाल व हक्क संरक्षण आयोगच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शाह, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिपक पांडेय यांनी अर्चना कटके यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अर्चना कटके ह्या बालकांचे होणारे लैंगिक शोषण व इतर गुन्हयाबाबत बालकामध्ये जनजागृती करण्यासाठी “कायदयाचे धडे” हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरिता तसेच नागरिकां करीता राबवत आल्या आहेत. आता पर्यंत एकूण ७१६ विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच सन २०२३ मध्ये एकूण २९ पिडीतांना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.
पोक्सो मधील पिडीत बालके तसेच विधीसंघर्षग्रस्त बालके यांना अनुक्रमे बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ या ठिकाणी घेऊन जाणे, पिडीत बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने संस्थेत दाखल करणे किंवा त्यांची वैद्यकीय तपासणीकरिता त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे होप फॉर दी चिल्ड्रेन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने टास्क फोर्स या उपक्रमांतर्गत दोन चारचाकी वाहने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या उपलब्ध करुन दिले. बाल न्यायालय यांचे आदेशान्वये ०२ विधीसंघर्षग्रस्त बालकांना नोकरीसाठी लागणारे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून दिले आहे. मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम-२०१५ या कायदयाचे तरतुदींचे महत्व व कायदयाचे संदर्भात तंतोतंत पालन होण्याकरिता वेळोवेळी कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. तसेच कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत पोलीस काका/दिदी या योजनेकरिता एक नोडल पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार तसेच, दामिनी मार्शल यांची नेमणूक आहे. संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी, दामिनी मार्शल तसेच विशेष बाल सुरक्षा पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श-वाईट स्पर्श (गुड टच बँड टच), सायबरचे वाढते प्रमाण व गुन्हेगारी, व्यसनाधीनता, प्रेम-मैत्री- आकर्षण, पोक्सो गुन्हे यासंदर्भात मार्गदर्शन केले. पुणे शहर पोलीस व होप फॉर दी चिल्ड्रेन फाऊंडेशन या एन.जी.ओ. यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ पोलीस स्टेशनपैकी २४ पोलीस स्टेशनमध्ये “बालस्नेही कक्ष” तयार करण्यात आलेले आहेत.
सदर कार्यक्रमास कु.आदिती तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य व विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते, विधान सभा, महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीमध्ये सदर पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे पार पडला आहे.
उत्कृष्ठ कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, तत्कालीन पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस
निरीक्षक, भरोसा सेल श्रीमती अनिता मोरे, श्रीमती व संगिता जाधव, यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, विशेष बाल सुरक्षा विभाग, भरोसा सेल, गुन्हे शाखा श्रीमती अर्चना कटके यांनी केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.