Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पैशाचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिक व बनावट पोलिसांन एका तरुणाचे 18 लाख रुपये लुटले पुण्यातील घटना

10

पुणे,दि.०४:- पुण्यातील हडपसर येथील ससाणे नगर परिसरात पैशांचा पाऊस पडण्याचा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशाचां पाऊस पाडतो म्हणून एका मांत्रिकाने एका तरुणाचे 18 लाख रुपये पळवल्याचे प्रकार समोर आलं आहे.
पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात एका ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या पैशाचे पाऊस पाडुन देतो असे सांगत एका तरुणाचे 18 लाख रुपये पळवणारा मांत्रिक आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चार जणांवर पुण्यातील हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्रमार्फत पैशाचे पाऊस पडतो असे सांगून बाबाने एक अघोरी पूजा मांडायला सांगितली होती. या पूजेसाठी 18 लाख रुपये रोख तिथे ठेवण्यात आले होते. मात्र तिथे आधीच आरोपींनी विनोद छोटेलाल परदेशी यांना फसवण्याचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे आरोपींनी रोख रकमेसह पूजा सुरु केली. मात्र पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही बनावट पोलीस आले. त्यांनी बाबासह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर विनोद परदेशी यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली. या प्रकरणी आता या भोंदू मांत्रिकासह तिघांचा हडपसर पोलीस शोध घेत आहेत.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

Leave A Reply

Your email address will not be published.