Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.१२ :- पुणे शहरात चालत असलेल्या ऑनलाइन गेमिंगविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी पत्ते हे खेळ खेळण्यात आले. मात्र, हे कृत्य करण्यामागची भूमिका समजल्यानंतर सर्वांनीच हे खेळ खेळणाऱ्यांचे कौतुक करत याबाबत सरकारने नियमावली करणे आवश्यक असल्याचे मत मांडले
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
लोकसंघर्ष पक्षातर्फे गेले काही महिने सातत्याने राज्य सरकारकडे ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याची मागणी केली गेली आहे. मात्र, यावर राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची कृती केलेली नाही. शासनाला जागे करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क ‘पत्ते खेळा’ आंदोलन करण्यात आले. ऑनलाइन गेमिंगमुळे आबालवृद्धांना वेड लावले आहे. याबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने नियमावली केलेली नाही. त्यामुळे लोकसंघर्ष पक्षाकडून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
ऑनलाइन गेमिंगमुळे लोकांना त्याचे व्यसन लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष ॲड. योगेश माकणे, संघटक ॲड. शिवम पोतदार, ॲड. अभिजित कुलकर्णी आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्ते खेळ पैसे लावून खेळण्यात आले. जर ऑनलाइन गेमिंगचा जुगार चालू शकतो, तर मग पारंपरिक पद्धतीने पैसे लावून खेळाला जाणारा जुगार कायद्याला का चालत नाही?, असा सवाल पक्षाच्या वतीने विचारण्यात आला. राज्य सरकारने पुढील दोन महिन्यात ऑनलाइन गेमिंगबाबत कठोर कायदे केले नाही, तर पक्षाच्या वतीने मंत्रालयासमोर ‘पत्ते खेळा’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे ॲड. माकणे यांनी सांगितले.