Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे, दि. १४ :- यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवरओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ कि.मी ७९/००० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.
या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) किवळे ब्रिजवरुन जुना महामार्गाने वळविण्यात येणार आहेत. पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरील येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस हायवेवर मुंबई मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!