Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बिबवेवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीला पुणे शहर पोलिस आयुक्तांनचा दणका मोक्का अंतर्गत 100 वी कारवाई ‘!
पुणे,दि.१६:- एका तरुणावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या सौरभ शरद शिंदे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ४ साथीदारांवर पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत १०० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.
याप्रकरणी १) सौरभ शिंदे, २) तेजस जगताप, ३) चंदर राठोड, ४) अनिकेत काटकर व ५) पंकज दिवेकर सर्व अप्पर बिबवेवाडी गुन्हा दाखल करुन यांना अटक केलीअसुन ते सद्या येरवडा जेल पुणे येथे आहेत.
याबाबत तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ८ नोव्हेंबर २०२३ रोजी कुसळकर किराणा मालाचे दुकानाचे गल्लीतुन आत, तीन मंदिराचे मोकळ्या मैदानात, अप्पर-बिबवेवाडी, पुणे. येथे घडली होती.
बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील प्रस्ताव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सविता ढमढेरे यांनी परिमंडळ- 5
पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, शाहूराजे साळवे,हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे
रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त आर राजा,
सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती सविता ढमढेरे, पोलीस उप-निरीक्षक बाळु शिरसट, तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार दैवत शेडगे, अनिल डोळसे व कृष्णा फुले यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, रितेशकुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल, यावर भरदेण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत.
त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली सन २०२३ या चालू वर्षातीस एकूण १०० वी कारवाई आहे. आता पर्यंत एकूण ६४९ आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.