Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्याने महिलेच्या चेहऱ्यावर झळकला आनंद, पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

7

पुणे ग्रामीण,दि. १६ :- पुणे ग्रामीण परिसरातील दुर्गम भागात रात्रीचे वेळी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी च्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये दागिने चोरी गेले होते
याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांना दरोडा, जबरी चोरी, घरफोडी झालेल्या घटनेची नागरिकांनी फिर्याद दिली होती. कष्टाने तयार केलेले दागिने परत मिळाल्याने महिलेनी व नागरिकांनी व्यक्त करत पुणे ग्रामीण पोलिसांचे आभार मानले.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

चोरी, घरफोडी झालेल्या घटनेचा पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी या घटनाप्रकारात स्वतः लक्ष देवून गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने घटनास्थळांना भेटी देवून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, सीसीटीव्ही तपासणे, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सर्वोतोपरी प्रयत्न करून गुन्हे केलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेत आला. मुद्देमालातील सोन्याचे दागिन्यांमध्ये जास्तीत जास्त दागिने हे महिलांचे असल्याने. अंकित गोयल,यांनी चोरीला गेलेल्या नागरिकांनचे दागिने लवकरात लवकर त्यांना सुपूर्त करणेकामी मा. न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेतले.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे माहे नोव्हेंबर २०२३ चे गुन्हे आढावा बैठकीदरम्यान गुन्हयात मा. न्यायालयाकडून आदेश प्राप्त असलेल्या पाच गुन्हयांमधील चोरी गेलेले सोन्याचे दागिने, फिर्यादी व पिडीत महिलांना अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे हस्ते सन्मानाने सुपूर्त करणेत आले.

सोन्याचे दागिने परत मिळाल्याने फिर्यादी व पिडीत महिलांचे चेहऱ्यावर आनंद दिसून आला व त्यांनी पुणे ग्रामीण पोलीसांचे आभार व्यक्त केले असून सदर कार्यक्रमास पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकारी.व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.