Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोटार सायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार गजाआड,सोलापुर ग्रामीण पोलिसांची कामगिरी…

9

सोलापूर (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीच्या तक्रारी ह्या वाढतच होत्या. तेव्हा वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे यांचे पथक मागील काही महिन्यात झालेल्या मोटार सायकल चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी तैनात केले होते.

या मध्ये मंगळवेढा पोलिस ठाणे येथे गुरनं ६२६/२०२३, भा.द.वि.क.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी बाळू सुरवसे हे त्यांची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक MH-१३ CZ- ८९२० ही घरासमोर लावून घरात झोपले असता अज्ञात चोरट्याने सदरची मोटार सायकल ही चोरून नेलेबाबत गुन्हा करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे यांचे पथक हे (दि.१४ डिसेंबर) रोजी मंगळवेढा पोलिस ठाणे च्या हद्दीत मालाविषयी गुन्ह्यांच्या संदर्भाने आरोपीचा शोध घेत असताना फिर्यादी बाळू सुरवसे यांची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्र. MH- १३ CZ- ८९२० ही मंगळवेढा शहरातील एका इसमाने चोरली असून तो बस स्थानक परीसरातील हॉटेलजवळ थांबला असल्याची माहिती पथकास मिळाली होती, त्यावरून सपोनि खुणे यांच्या पथकाने सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले. सदर इसमाला विश्वासात घेवून तपास करता त्याने अशा प्रकारच्या आणखी ५ मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे कबूल केले. तसेच चोरी केलेल्या मोटार सायकल या त्याच्या राहते घराच्या मागील बाजूस असणारे पत्रा शेडमध्ये लपवून ठेवले असल्याचे सांगितले. त्यावरून सदरच्या आणखी ५ ही मोटार सायकल या जप्त केल्या असुन. सदर मोटार सायकलचे आर.टी.ओ. क्रमांक मोटार सायकल वरून काढून टाकण्यात आले आहेत.

१) होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक MH- १३ CZ- ८९२०, चेसी क्र. JC65E72053500 (शेरा –
मंगळवेढा पो.ठा. गु.र.नं.६२६/२३)

२) बजाज कंपनीची बॉक्सर मॉडेलची बजगा रंगाची, क्रमांक MH-११/N-१३७९, चेसी क्र. 31 MBEA83059 (शेरा – पंढरपूर शहर पो. ठा. गु.र.नं.७५६/२०२३,)

३) सुझुकी कंपनीची, काळे रंगाची मोटार सायकल,चेसीस क्र. 3604F052353 (शेरा – साठे नगर, मंगळवेढा येथून चोरी केलेली)

४) हिरो होंडा कंपनीची, काळे रंगाची मोटार सायकल,चेसीस क्र. 96D19F007726 (शेरा – शिवाजी तालीम, मंगळवेढा येथून चोरी केलेली)

५) सुझुकी कंपनीची, काळे रंगाची मोटार सायकल,चेसीस क्र. 1003F574989 (शेरा – शिवाजी तालीम, मंगळवेढा येथून चोरी केलेली)

६) हिरो होंडा कंपनीची, काळे रंगाची मोटार सायकल,चेसीस क्र. 06H29e13424 (शेरा – शनिवार पेठ, मंगळवेढा येथून चोरी केलेली)

यातील अ.क्र ३ ते ६ मोटार सायकलचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन क्रमांक हे आरोपीने काढून टाकून दिले असल्याने मोटार सायकलच्या मालकांचा शोध घेणे सुरू आहे. तरी या द्वारे मंगळवेढा शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरील वर्णनाच्या मोटार सायकल ज्यांच्या असतील त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण (मोबाईल क्रमांक ८०८२५९०१९९०) येथे संपर्क करावा. यातील अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे गु.र.नं.७५६/२०२३, भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे देखील गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी  शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली नागनाथ खुणे, सहायक पोलिस निरीक्षक, यांचेसह सफौ. शिवाजी घोळवे, श्रीकांत गायकवाड, पोहवा रवि माने, पोह, पोशि अजय वाघमारे, सुरज रामगुडे, अन्वर आत्तार, प्रमोद माने यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.