Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एक वर्षापासुन गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी टोळी प्रमुख हैदर अली हा चाळीसगांव शहर पोलिसांकडुन जेरबंद….
चाळीसगाव(जळगाव) (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 18/11/2022 रोजी रात्री 09.00 वा चे सुमारास आण्णा कोळी यांचे घरासमोर, छाजेड ऑईल मिलच्या मागे, चाळीसगाव येथे हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबिर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबिर खान, शेख नवाज शेख सलीम व इतर दोन अनोळखी इसमांनी एकत्रीत येवुन, फिर्यादी वैभव अरुण रोकडे वय 24 वर्ष व साक्षीदार यांनी आरोपींना त्यांना पृथ्वी कुमावत याला मारहाण का केली याबाबत विचारणा केली म्हणुन फिर्यादी व साक्षीदारांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके व चॉपरने फिर्यादीच्या डोक्यात व साक्षीदाराच्या मांडीवर घाव घालून गंभीर दुखापत केली होती.
वर नमुद प्रकारावरुन चाळीसगांव शहर पोलिस स्टेशन येथे दिनांक 19/11/2022 रोजी वर नमुद आरोपीतांविरुध्द गुरनं. 493/2022 भादवि कलम 307, 323, 143, 144, 147, 148, 149, 506 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे उल्लघंन 135 प्रमाणे गुन्हा नोंद असुन गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली हा आज पर्यंत फरार होता
एम. राजकुमार पोलिस अधिक्षक,अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे ,सहा.पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पोलिस निरीक्षक, संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले होते, पथकातील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व नायक पोलीस शिपाई महेंद्र पाटील,भुषण पाटील, पोशि विजय पाटील, अमोल भोसले, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रकाश पाटील, मपोहवा विमल सानप यांनी सदर गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली याचा कसुन शोध घेवुन देखील गुन्ह्यातील आरोपी मिळुन येत नव्हता परंतु आज दिनांक 19/12/2023 रोजी नापोशि महेंद्र पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी हैदर अली आसिफ अली हा त्याच्या राहते घरी आलेला असल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविल्याने, त्यांनी वर नमुद पथकास आदेशीत करुन, तात्काळ आरोपीताच्या घरी रवाना केले असता दिनांक 18/11/2022 रोजी पासुन फरार आरोपी चाळीसगांव शहर पोलिसांच्या ताब्यात आला असुन, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. नमुद आरोपीताविरुध्द आज पर्यंत शरीराविरुध्दचे 11,
मालाविरुध्दचा 01, महिला अत्याराविरुध्दचा 01 असे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत तसेच त्यास 02 वेळा हद्दपार व 01 वेळा MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. निव्वळ गुन्ह्याचे तपासात नमुद आरोपीताची पोलिस कोठडी घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक बिरारी व पोहवा विनोद भोई,
पोशि प्रकाश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.