Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अवैध हातभट्टी दारु विक्रीचे सतत गुन्हे करणाऱ्या सराईत महीला गुन्हेगारास एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षा करीता केले स्थानबध्द,पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार मा. जिल्हाधिकरी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश…
हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सराईत गुन्हेगाराबाबत एमपीडीए अंतर्गत सलग ३१ वी कार्यवाही केली पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणा-या विरुध्द कडक कार्यवाहीची भूमीका घेउन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इत्यंभुत माहिती काढुन ते करत असलेल्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी त्याच्या विरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रीया संहिता व एमपीडीए कायदया अंतर्गत प्रभावी प्रतीबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.त्यानुसार
धोकादायक महिला लताबाई गनपत काळे वय ३५ वर्ष रा इंदिरानगर हिंगोली ता जि.हिंगोली. यांचेवर मागील अनेक वर्षापासुन हिंगोली जिल्हयातील पो.स्टे हिंगोली शहर हद्दीत अवैध हातभट्टी दारु विक्रीचे चे एकूण(१३) गुन्हे दाखल होते. तसेच तिचेवर मदाका ९३ प्रमाणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली होती तरीही ती सतत गुन्हे करित होती. समाजासाठी धोकादायक बनली होती तिच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिकां मध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली होती, तसेच सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्येवस्थेस बाधा पोहचविणारी धोकादायक महीला बनली होती म्हणुन पोलिस अधीक्षक यांचे आदेशाने सदर प्रकरण पोलिस निरिक्षक नरेंद्र पाडाळकर पो.स्टे
हिंगोली शहर यांनी सुरेश दळवे, उप विभागीय पोलिस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर यांच्या मार्फतीने नमुद महिला विरुध्द महाराष्ट्र झोपडटटी गुंड, हातभटटीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ ( एम. पी.डी.ए) चे कलम ३ (१) अन्वये कार्यवाहीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांच्या कडे सादर केला होता. पोलिस
अधीक्षक, हिंगोली यांनी सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या कडे पाठविला होता. मा. जिल्हाधिकारी, हिंगोली श्री जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करून नमुद
धोकादायक महिला नामे लताबाई गनपत काळे वय ३५ वर्ष रा इंदिरानगर हिंगोली ता जि.हिंगोली ही सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरून धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्यास एपीडीए १९८१ (सुधारणा १९९६, २००९ आणि २०१५) कलम ३ (२) अन्वये एक वर्षाकरीता कारागृहात स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असुन नमुद स्थानबध्द महिलेस ताब्यात घेण्यात आले असुन त्यास परभणी मध्यवर्ती कारागृह, परभणी येथे दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे.
सदर प्रस्ताव तयार करण्यामध्ये पोलिस निरीक्षक विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, प्रतिबंधक कार्यवाही पथक, स्थागुशा हिंगोली, तसेच पो.स्टे हिंगोली शहरचे पोलिस निरीक्षक नरेन्द्र पाडाळकर, पोउपनि कपील आगलावे, पोहवा अशोक धामने
यांनी महत्वाची भुमिका पार पाडली आहे.