Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत मोटारसायकल चोरटा नांदेड पोलिसांचे ताब्यात,४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

13


सराईत मोटारसायकल चोरटा नांदेड पोलिसांचे ताब्यात,४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…




मोटासायकल चोरटा नांदेड पोलिसांच्या ताब्यात.. 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत श्रीकृष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलिस अधीक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते, त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन विमातळ नांदेड येथील प्रभारी पोलिस अधिकारी विजय जाधव यांनी गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्या बाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, पो.स्टे. विमानतळ नांदेड येथील गुन्हे शोध पथका प्रमुख पो.उप.निरी. श्री जाधव, सोबत पोहवा राठोड,  पठाण, जावेद, पोशि भिसे, कुलथे,डोईफोडे यां सर्वाना मोटार सायकल चोरीचे आरोपीची माहीती प्राप्त झाली की, पोलिस स्टेंशन विमानतळ नांदेड येथील गु.र.न. 375/2023 कलम 302, 120 (ब) भा.द.वि. व सह कलम 04/25 भा.ह.का. मधिल आरोपी नामे विश्वास परमेश्वर शिंदे (वय 21 वर्ष) व्यवसाय बेकार रा.शारदानगर नांदेड ह्याने नांदेड शहरातील विविध ठिकाणच्या मोटार सायकल हया चोरी केलेल्या आहेत. त्यावरुन सदर गुन्हयातील आरोपी यास पोलिस स्टेशन विमानतळ नांदेड गु.र.न. 339/2023 कलम 379 भा.द.वि. मध्ये संशयीत रित्या मा.न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेवुन त्यास अटक करुन त्यांना पोलिस कोठडी. दरम्यान विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयातील वाहना सोबत इतर पाच मोटार सायकल या काढुन दिल्या आहेत त्यांचेकडुन असा  एकुण 4,20,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक भोकर डॅा खंडेराव धरणे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी  श्रीमती किर्तीका सी.एम. उप.विभाग नांदेड शहर नांदेड पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने पोलिस निरीक्षक पो.स्टे. विमानतळ नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वरील गुन्हे शोध पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.